नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं सर्वसमावेशक बजेट मांडल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. निर्मला सीतारामण आणि त्यांच्या टीमला चांगला बजेट सादर केल्याबद्दल शुभेच्छा देतो. 2022पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. बजेटमध्ये भावी पिढ्यांचाही विकासाची संकल्पना आहे. देशाला समृद्ध, प्रत्येकाला समर्थ बनवणारा हा बजेट आहे. या बजेटनं गरिबाला बळ मिळणार असून, तरुणांना चांगलं भविष्य मिळणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पुढे मोदी म्हणतात, बजेटमधून मध्यमवर्गाची प्रगती होणार आहे. विकासाच्या प्रगतीला गती मिळणार असून, या बजेटनं टॅक्स व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. हा बजेट उद्यम आणि उद्यमशील लोकांना मजबूत करणारा आहे. या बजेटमुळे देशाच्या विकासात महिलांची भागीदारी आणखी वाढणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणार होणार आहेत. बजेटमुळे शिक्षण क्षेत्रात उत्साह वाढणार आहे.
Union Budget 2019: 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, अर्थसंकल्पावर मोदी खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 4:48 PM