शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Union Budget 2019: सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात ‘गाव, गरीब आणि ग्रीन’ला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 6:10 AM

यापूर्वीचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक वर्ष २०१९ मध्ये पेट्रोल, डिझेलवरील कराच्या माध्यमातून २.५७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभा केली होती.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पहिला अर्थसंकल्प हा यापूर्वीचे अर्थमंत्री अरुण जेटली यांची पाच वर्षांची परंपरा कायम ठेवणारा होता. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना आणि महागाई नियंत्रणात असताना जेटली यांनी मोठा महसूल जमविला. निर्मला सीतारामन यासुद्धा जेटलींपेक्षा वेगळया नाहीत हे दिसून आले.निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लीटर १ रुपया अतिरिक्त अबकारी कर आणि रस्ते व पायाभूत सुविधांसाठी १ रुपया अतिरिक्त उपकर आकारला आहे. या माध्यमातून एका वर्षात १२०० कोटी रुपयांचा निधी उभारता येणार आहे. कारण, महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. त्यामुळे सरकारने परिस्थितीचा पूर्ण फायदा उठविला.यापूर्वीचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक वर्ष २०१९ मध्ये पेट्रोल, डिझेलवरील कराच्या माध्यमातून २.५७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभा केली होती. तेव्हापासून पेट्रोलियम उत्पादनांपासून कर जमा करण्याची पद्धत सुरु आहे. २०१३-१४ मध्ये हा कर ८८,६०० कोटी होता. नंतरच्या काळात त्यात मोठी वाढ झालेली दिसून येते.श्रीमंतांना अतिरिक्त कर लावण्याची जेटली यांची परंपरा निर्मला सितारामन यांनी कायम ठेवली आहे. २ ते ५ कोटी आणि ५ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या वर्गाला आता अनुक्रमे ३ आणि ७ टक्के कर लागणार आहे. ‘सुपर रिच’ची ही करपद्धती अरुण जेटली यांनी सादर केली होती. १ कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या वर्गाला त्यांनी १० टक्के अधिभार आकारला होता. अन्य करदात्यांसाठी कररचनेत बदल करण्यात आलेला नाही. या अर्थसंकल्पाकडे राजकीयदृष्टया पहायचे झाल्यास मोदी यांच्या दुसºया कार्यकाळातील पहिले बजेट हे ‘गाव, गरीब आणि ग्रीन’ यावरच केंद्रीत झालेले आहे.

‘मंदी लक्षात घेत सुरक्षित पावले उचलली’म्युच्युअल फंडसला कोणतेही प्रोत्साहन मिळालेले नाही. साहजिकच बाजार निराश होऊ शकतो. पण, एनबीएफसी (नॉन बँकींग फायनान्स सेक्टर)आणि पीएसयू (सार्वजनिक बँका) यांना बूस्टर मिळाला आहे. ४०० कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स सध्याच्या ३० टक्क्यांवरुन २५ टक्के करण्यात आला आहे. सध्या २५० कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असणाºया कंपन्यांना किमान कर लागू आहे. पहिल्या वर्षाचे बजेट लोकप्रिय असण्याची अपेक्षा नव्हती. कारण, निवडणुका अद्याप दूर आहेत. जागतिक मंदी आणि अनिश्चितता लक्षात घेता मोदी यांनी सुरक्षित पाऊले उचलली आहेत.परवडणारी घरे बांधण्यास वेग : स्वदेशी जागरण मंचअर्थसंकल्पातील तरतुदींमुळे परवडणारी घरे निर्माण करण्याच्या कार्याला व क्षेत्रांतील विकासालाही वेग येणार आहे अशी प्रतिक्रिया संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंचेचे संयोजक अश्वनी महाजन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, लघुउद्योगांचा विकास, इलेक्ट्रॉनिक वाहनांची खरेदी यांना या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल. लोकानुनयी नसलेला व अर्थ व्यवस्थस्था मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रसारमाध्यमे, विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविल्याबद्दल मात्र महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.आता गांधीपीडियाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गांधीपीडियाचा उल्लेख भाषणात केला. त्यात महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांचे साहित्य आणि गांधीजींवरील पुस्तके यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्घाटन केलेल्या संकेतस्थळावर हा सर्व मजकूर उपलब्ध होणार आहे. महात्मा गांधी यांचे साहित्य, तत्वज्ञान, ध्वनिमुद्रित भाषणे, ध्वनिचित्रफिती व दुर्मीळ छायाचित्रेही या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.सुधारणा, परिवर्तन व कामगिरीसुधारणा, परिवर्तन व कामगिरी यांवर निर्मला सीतारामन यांनी अर्थसकल्पीय भाषणात भर दिला. त्या म्हणाल्या की देशात सुधारणा व परिवर्तन घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे आणि ते आम्ही आमच्या कागगिरीद्वारे घडवून आणू, असा आपणास विश्वास आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी