नवी दिल्लीः केंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं. परंतु केंद्राच्या याच निर्णयावर आरएसएसशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघा(BMS)नं टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जीवन विमा निगम आणि बँकांच्या निर्गुंतवणुकीवर भारतीय मजदूर संघानं प्रश्न उपस्थित केलं आहेत.राष्ट्राची संपत्ती विकून पैसे जमवण्याची पद्धत ही चुकीच्या अर्थशास्त्राचं उदाहरण आहे. संघाशी संलग्न असलेल्या या संघटनेनं सरकारमधील आर्थिक सल्लागार आणि नोकरशाहांवर निशाणा साधत ज्ञान आणि दृष्टिकोनात कमी असल्याची टीका केली आहे. सरकारनं राष्ट्राची संपत्ती विकून महसूल गोळा करण्याचा कोणताही मॉडल तयार करू नये, तेच त्यांच्यासाठी योग्य आहे. भारतीय जीवन विमा निगम देशाच्या मध्यम वर्गाच्या बचतीला सुरक्षित ठेवण्याचा उपक्रम आहे.तर आयडीबीआय बँक ही छोट्या उद्योगांना वित्तपुरवठा करते. अशातच दोघांमधील भागीदारी विकण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे त्यांना परिणाम भोगावे लागू शकतात. दोन्ही उपक्रमात सरकारला भागीदारी विकण्याची भरपाई करावी लागणार आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीत सरकारच्या निर्णयांविरोधातील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Budget 2020: राष्ट्राची संपत्ती विकून पैसे जमवण्याचा प्रकार चुकीचा, भारतीय मजदूर संघांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:39 PM
केंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं.
ठळक मुद्देकेंद्र सरकारनं एलआयसी आणि आयडीबीआयमधली भागीदारी विकणार असल्याचं बजेटच्या माध्यमातून काल जाहीर केलं. केंद्राच्या याच निर्णयावर आरएसएसशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघा(BMS)नं टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जीवन विमा निगम आणि बँकांच्या निर्गुंतवणुकीवर भारतीय मजदूर संघानं प्रश्न उपस्थित केलं आहेत.