नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. इन्कम टॅक्स आणि इतर सामान्यांशी संबंधित असलेल्या कररचनेत काहीही बदल करण्यात आले नाही. त्यामुळे, यंदाच्या बजेवर विरोधकांकडून टीका होत आहे. परंतु क्रिप्टोकरन्सी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल रूपी नावाची डिजिटल करन्सी लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा सितारमण यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना पीपल्स फ्रेंडली आणि प्रोग्रेसीव्ह बजेट असल्याचं म्हटलं आहे.
विकासाचा नवा विश्वास घेऊन आलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना अनेक संधी उपलब्ध करुन देणार हा अर्थसंकल्प आहे. यंदांचे बजेट more Infrastructure, More Investment, More Growth, आणि More Jobs च्या संभाव्यतेनं भरलेला बजेट आहे. त्यामुळे, ग्रीन जॉब्सच्याही संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत देशवासीयांना संबोधित केले.
देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला सुनिश्चित करते. गेल्या काही ताासांपासून मी पाहातोय, सर्वसामान्या नागरिकांपासून ते विविध क्षेत्रातील लोकांनीही या बजेटचं स्वागत केलंय. गरीबांचं कल्याण करणारा हा अर्थसंकल्प आहे, गरिबांना घर, नळ, गॅस आणि शौचालय यांसारख्या सुविधा गरिबांपर्यंत पोहोचविण्याचं काम या बजेटमधून होणार आहे, असेही मोदींनी सांगितले. तसेच, पूर्वेत्तर देशांशाठी पर्वतमाला योजना सुरु करण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठीही महत्त्वपूर्ण बजेट आहे. कारण, गंगा नदी तिरावर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी योजना कार्यान्वित होत आहे, असेही मोदींनी सांगितले. पीपल्स फ्रेंडली आणि प्रोग्रेसीव्ह बजेटसाठी मी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे अभिनंदन करतो, असेही मोदींनी म्हटले.
भारताला अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प
भारताला आत्मनिर्भरतेकडे आणि अधिक बलशाली करणारा अर्थसंकल्प मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा भविष्यातील भारताचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
सहकार क्षेत्राला खासगी क्षेत्राशी स्पर्धा करता येईल
शेतकरी आणि कष्टकरी केंद्रीत या अर्थसंकल्पात शेतकर्यांच्या कल्याणासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकर्यांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. 1 लाख मेट्रीक टन भातखरेदीसह 2.37 लाख कोटी रूपये हे एमएसपीवर खर्च होणार आहेत. शेती क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. शेती क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. सहकाराच्या क्षेत्रासाठी क्रांतिकारी विचार करताना सुद्धा प्राप्तीकर 18.5 टक्क्यांहून 15 टक्के करण्यात आला. सरचार्ज 12 वरून 7 टक्के करण्यात आला. यामुळे सहकार क्षेत्राला सुद्धा आता खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करता येणार आहे. ‘हर घर नल से जल’ या योजनेसाठी 60 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून सर्वसामान्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.