Union Budget 2022 Share Market Digital Rupee: Digital Rupee Union Budget 2022 Share Market: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलनाची चर्चा आहे. पण भारत सरकारने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण अर्थसंकल्पामध्ये याबद्दल घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) लवकरच डिजिटल रूपी नावाचं डिजिटल चलन व्यापारासाठी आणलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं. त्याचा परिणाम थेट शेअर मार्केटवर झाला आणि सेन्सेक्सने १ हजार अंकांवर उसळी घेतली.
जगभरात डिजिटल चलनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा वेळी भारतातही क्रिप्टोकरन्सीला मंजूरी मिळावी अशी मागणी होत होती. याबाबत बोलताना भारताकडून डिजिटल रुपी (Digital Rupee) बाजारात आणला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या डिजिटल चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बुस्ट मिळेल, असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच शेअर बाजाराला या घोषणेने नक्कीच बूस्ट मिळाला. अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरू असतानाच सेन्सेक्स पटकन एक हजार अंकांनी वधारला. तसेच निफ्टीही १७,६०० अंकांच्यावर गेला. सेन्सेक्स ८७९.६२ अंकांनी वधारून ५८,८९३.७९ वर आहे. निफ्टी २३४.७० अंकांनी वाढला आणि सध्या १७,५७४.५५ वर पोहोचला.