01 Feb, 23 02:18 PM
"देशातील छोटे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल. हे बजेट ग्रीन इकोनॉमी, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन टेक्नोलॉजीवर आधारित आहे. देशाला आज नेस्ट जनरेशन इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असून यावेळी पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
01 Feb, 23 02:16 PM
मध्यवर्गीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असून बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकलं जात आहे. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील दरी कमी होईल- नरेंद्र मोदी
01 Feb, 23 02:14 PM
अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा देशवासियांशी संवाद
पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं केलं कौतुक, हा अर्थसंकल्प कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य बदलेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
01 Feb, 23 12:35 PM
करदात्यांसाठी मोठा दिलासा
नव्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅबची संख्या ५ पर्यंत कमी करण्यात आली आहे.
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के
01 Feb, 23 12:27 PM
करदात्यांना मोठा दिलासा; ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त!
करपात्र उत्पन्नाची मर्यादा आता २ लाखांनी वाढवली आहे. याआधी पाच लाखांपर्यंतंच उत्पन्न करमुक्त होतं, आता ७ लाखांपर्यंतंच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही
01 Feb, 23 12:14 PM
सोनं, चांदीवरील इम्पोर्ट ड्युटीत वाढ
01 Feb, 23 12:11 PM
इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल उत्पादनात ३१ कोटी युनिट्सनं वाढ झाली; इमोर्ट कॅमेरा लेन्स, लिथियम आयन सेल्सवरील कस्टम ड्युटीत कपात
01 Feb, 23 12:07 PM
- लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी ९ हजार कोटींची क्रेडीट गॅरंटी
- युवकांना जागतिक स्तरावर नोकऱ्या मिळण्यासाठी ३० केंद्र उभारणार
- लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी २ हजार कोटींचे कर्ज वाटप
01 Feb, 23 12:05 PM
01 Feb, 23 12:00 PM
- पीएम प्रणाम- सेंद्रिय शेतीसाठी योजना
- ग्रीन एनर्जीसाठी ३५ हजार कोटींची तरतूद
- देशात २०० बायोगॅस प्लँट उभारण्यात येणार
- २०७० पर्यंत शुन्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य
01 Feb, 23 11:55 AM
- २०३० पर्यंत ५ मेट्रीक टन हायड्रोजन उत्पादनाचं लक्ष्य
- हरित विकासावर सरकारचा भर
- शून्य कार्बन उत्सर्जनासाठी योजना आखणार
01 Feb, 23 11:55 AM
केंद्र सरकार राज्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची सुविधा एका वर्षासाठी वाढवणार आहे
01 Feb, 23 11:52 AM
- ऊर्जा विभागासाठी ५० हजार कोटींची तरतूद
- ई-कोर्टासाठी ७० हजार कोटींची तरतूद
- पीएस आवास योजनेचा फंड ६६ टक्क्यांनी वाढला
01 Feb, 23 11:49 AM
येत्या ३ वर्षात १ कोटी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणार, यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा आणि संसाधने उपलब्ध करुन देणार
01 Feb, 23 11:48 AM
01 Feb, 23 11:48 AM
- सरकार नॅशनल डेटा गव्हर्नस पॉलसी आणणार
- व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅनकार्ड मुख्य धागा राहणार
- डीजी लॉकरचा वापर वाढवण्यावर भर
- आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ३ केंद्र उभारणार
01 Feb, 23 11:44 AM
5G सेटअप उभारण्यासाठी १०० लॅब्स तयार केल्या जाणार
01 Feb, 23 11:39 AM
रेल्वेसाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद; तर देशात ५० नवीन विमानतळ उभारणार
01 Feb, 23 11:37 AM
- एकलव्य निवासी शाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षण देणार
- शिक्षकांची नियुक्ती आदिवासी विकास मिशनच्या माध्यमातून करणार
01 Feb, 23 11:29 AM
पायाभूत सुविधांसाठी तब्बल १० लाख कोटी रुपयांपर्यंत खर्च करणार, पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चात ३३ टक्क्यांची वाढ
01 Feb, 23 11:29 AM
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य २० लाख कोटी रुपये केले जाईल: सीतारामन
01 Feb, 23 11:27 AM
वैद्यकीय, शिक्षण विभाग
- वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार
- १५७ नवे नर्सिंग कॉलेजेस सुरू करणार
- ICMR लॅब्सना अद्ययावत सुविधा प्राप्त करुन देणार
- नॅशनल डिजिटल लायब्ररी उपलब्ध करुन देणार, यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणार
01 Feb, 23 11:24 AM
- अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी कसून प्रयत्न करणार
- देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार
- अन्नसाठवण विकेंद्रीकरण प्रक्रियेवर भर देणार
01 Feb, 23 11:20 AM
शेतीसाठी विशेष घोषणा
- कापसापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न
- डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार
- हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान
01 Feb, 23 11:15 AM
जागतिक पातळीवरील आव्हानांचा विचार करता आम्ही लोकाभिमुख अजेंड्यावर काम करतोय - अर्थमंत्री
01 Feb, 23 11:14 AM
पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या सहभागानं प्रयत्न सुरू, पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष देणार
01 Feb, 23 11:13 AM
हरित ऊर्जा धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं विविध क्षेत्रात महत्वाची पावलं उचलली.
01 Feb, 23 11:10 AM
कोविड महामारीच्या काळात, आम्ही २८ महिन्यांसाठी ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याच्या योजनेद्वारे कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतली- निर्मला सीतारामन
01 Feb, 23 11:08 AM
- यूपीआय, कोविन अॅप यामुळे जगाने भारताचं महत्व मान्य केलं
- दरडोई उत्पनात दुपटीनं वाढ, आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
- जी-२० अध्यक्षपद मिळणं ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट
- ४७.८ कोटी जनधन बँक खाती उघडली गेली.
01 Feb, 23 11:03 AM
आर्थिक विकास वाढीचा दर ७ टक्के इतका राहील, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जगाने भारताची ताकद मान्य केली
01 Feb, 23 11:02 AM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात
01 Feb, 23 09:09 AM
निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प
सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवतील.
01 Feb, 23 10:34 AM
अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेतील सदस्यांना देण्यासाठी ट्रकमधून आणण्यात आल्या
01 Feb, 23 10:24 AM
अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ नाही
01 Feb, 23 09:58 AM
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर निर्मला सीतारामन संसदेच्या दिशेनं निघाल्या, सकाळी ११ वाजता संसदेत सादर करणार अर्थसंकल्प
01 Feb, 23 09:50 AM
शेअर बाजारात आश्वासक सुरुवात
सेन्सेक्सची ४३७.३२ अंकांची उसळी; सध्या ५९,९८७.२२ अंकांवर करतोय व्यवहार
01 Feb, 23 09:36 AM
निर्मला सीतारामन राष्ट्रपतींच्या भेटीला
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
01 Feb, 23 09:22 AM
शेअर बाजारात तेजी
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. प्री मार्केट ओपनिंगमध्ये २५० अंकांनी सेन्सेक्समध्ये वाढ झाली आहे. तर निफ्टीत २०० अंकांची तेजी पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर डॉलरच्या तुलनेत रुपया १५ पैशांनी मजबूत
01 Feb, 23 09:10 AM
अर्थसंकल्पात रेल्वेलाही मोठ्या आशा
वंदे भारत २.०, ३५ हायड्रोजन ट्रेनची भेट मिळू शकते. या अर्थसंकल्पात ४०० ते ५०० वंदे भारत गाड्या, ४००० नवीन ऑटो मोबाईल वाहक डबे, ५८००० वॅगन गाड्यांची भेट मिळू शकते.