Budget 2025 Funny Memes: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या ११ घोषणा केल्या. शेतकरी, मध्यमवर्ग, महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स'मध्ये सर्वात मोठी घोषणा केली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार नाही. कर स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्पन्न करात मोठी सवलत जाहीर केली आहे. यात १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, अशी घोषणा केली. ही बातमी सोशल मीडियावर येताच #NoTax हा हॅशटॅग व्हायरल झाला होता. यानंतर आता नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत. मध्यमवर्गीयांनी आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचं कौतुक केले आहे.
मीम्स शेअर करुन निर्मला सीकारमण यांचं कौतुक केले