कोलकाता - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने 36 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर हजारो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या अनलॉक-4 च्या निर्णयावरून निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार अनलॉक-4 चा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारला लागू करायचे असतात आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घेणे आवश्यक अत्यंत आवश्यक आहे. केवळ मार्गदर्शक सूचना जारी करणे पुरेसे असत नाही. केवळ जिल्हा प्रशासनालाच स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे याची माहिती असते. हे सर्व राज्यघटनेच्या संघीय प्रणालीवर आधारित आहे आणि सर्वांनांच यामध्ये सहकार्य करायला हवं असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जीएसटीच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती राज्यांना झालेल्या जीएसटीच्या नुकसानीची भरपाई न देणे हे देशाच्या संघराज्यीय संरचनेला कमजोर करण्यासारखं असल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला.
नवीन गाईडलाईननुसार केंद्राने 8 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार कोलकाता मेट्रो 8 सप्टेंबरपासून सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केली जाणार आहे. याशिवाय राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबरला संपूर्ण लॉकडाऊन राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने, नागरिकांनाच परवानगी राहणार आहे. राज्यातील शाळा, कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना केंद्राने सांगितल्याप्रमाणे कोणतीही सूट देण्यात येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ
शाब्बास पोरी! जखमी झाली तरी नेटाने लढली, 15 वर्षीय मुलीने चोरांना चांगलीच अद्दल घडवली
'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध