PM Modi Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आता विविध मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे. यात दोन महत्वाच्या मंत्रालयाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्रालयासाठी आता नवे चेहरे नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. (Union Health Minister Dr Harsh Vardhan resigns from Union Cabinet, ahead of Cabinet Reshuffle)
मोदींनी घेतला महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा राजीनामा; दुसरे तातडीने दिल्लीला रवाना
कोरोनाच्या काळात देशाच्या आरोग्य मंत्रालयावर खूप मोठा ताण वाढला. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक आरोप आणि व्यवस्थापनाच्या त्रृटींवरुन टीकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे आता सध्याच्या कोरोना संकटात डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेऊन या खात्याची धुरा नेमकी कोणाकडे सोपवली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.