केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांनी शुक्रवारी (14 ऑगस्ट) कोरोना संसर्ग झाल्याची ट्विट करून माहिती दिली आहे. ते ट्विट करत म्हणाले की, “माझा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे आणि मार्गदर्शक सूचनांनुसार मी घरी अलगीकरणात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य पथक तपासणी करणार आहे. तसेच माझ्या मित्रांना, सहका-यांना तपासणी करण्याची विनंती केली आहे.शुक्रवारी दिल्लीतील कोरोनामध्ये 1192 नवीन रुग्ण बाहेर आल्याने राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संक्रमणाची एकूण संख्या दीड लाखांवर गेली आहे. त्याच वेळी या साथीच्या आजारात एकूण 4,178 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या आरोग्यविषयक बुलेटिननुसार, कोरोनामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण मृतांचा आकडा 4,178 झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 9:29 PM