नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट कायम असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच झिका व्हायरस परिस्थितीच्या देखरेखीसाठी एक पथक केरळमध्ये जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (union health ministry says we need to continue to take all precautions over coronavirus)
केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. एकूण नवीन कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत.
हीच ती वेळ! देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता; हायकोर्टाने केले स्पष्ट
कोरोना नियमांचे उल्लंघन गंभीर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या नियमित पत्रकार परिषदेत मसुरी येथील केम्प्टी फॉल्सचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. यासंदर्भात बोलताना कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसत असून, ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे लव अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले. तसेच बांगलादेशात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला असून, तेथील रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेपेक्षा कमालीने वाढली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
केरळमध्ये जाणार केंद्रीय पथक
केरळमध्ये झिका व्हायरसचे काही रुग्ण आढळून आले असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचे एक केंद्रीय पथक केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने कोरोनाच्या सातव्या व्हेरिएंट ओळख पटवली आहे. यासंदर्भात निरीक्षणे नोंदवली जात असून, नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर
पर्यटनासह कोरोना नियम आवश्यकच
नीती आयोगातील आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, पर्यटन, आजीविका यांसह अर्थचक्र सुरू राहणे गरजेचे आहे, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणेही आवश्यकच आहे. कोरोना नियमांना बगल देऊन खुलेपणाने व्यवहार, वर्तन करण्याची ही योग्य वेळ नाही. तसेच गर्भवती महिलांना कोरोनाची लस देण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याची माहिती पॉल यांनी यावेळी दिली.
“डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”
लंबडा व्हेरिएंटचा भारताला धोका नाही
भारतात अद्यापतरी लंबडा या व्हेरिएंचा धोका नाही. पेरू देशात या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, भारतात या व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही काही जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. एका दिवशी ३६ ते ३८ हजार नव्या रुग्णांची नोंद होणे ही गंभीर बाब आहे. कोरोना नियमांचे पालन केले नाही, तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकेल, अशी भीती पॉल यांनी यावेळी व्यक्त केली.