Congress Protest in Black Dress: केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले. यादरम्यान राजधानी दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घालून विरोध दर्शवला. यावरुन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी काँग्रेसच्या निशाणा साधला आहे. ''काँग्रेसने आजच्या दिवशी जाणीवपूर्वक काळे कपडे घालून निषेध केला. आजचा दिवस खास आहे, या प्रसंगी त्यांनी ठरवून विरोध केला.'' यावेळी शहा यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
आज काळे कपडे का घातले?
गृहमंत्री पुढे म्हणाले की, ''आज कोणाचीही ईडी चौकशी झाली नाही, मग काँग्रेसने काळ्या कपड्यात आंदोलन का केले? काँग्रेसने जबाबदार पक्ष म्हणून कायद्याला सहकार्य करायला हवे. काँग्रेस फक्त तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी झाली, हाच दिवस पाहून काँग्रेस गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहे. काळे कपडे घालून निषेध करण्यात काय अर्थ आहे?'' असा सवाल त्यांनी यावेळी केला.
'कायद्याला सहकार्य करा'अमित शहा पुढे म्हणाले की, ''काँग्रेसने कायद्याचे पालन करावे, त्यांनी जबाबदार पक्ष म्हणून सहकार्य केले पाहिजे. तक्रारीच्या आधारे प्रकरण सुरू आहे. त्यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा सर्वांनी आदर केला पाहिजे.'' यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''आतापर्यंत काँग्रेस सामान्य कपड्यात आंदोलन करत होती, पण आज त्यांनी काळे कपडे घालून विरोध केला. हा सर्व राम भक्तांचा अपमान आहे. त्यांनी हा दिवस निवडला कारण आज अयोध्या दिन आहे.''