शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बंगाल दौऱ्यावरून पत्रकाराचा सवाल, तुम्ही तर इथंच घर घ्यायला हवं; बघा- अमित शाहंनी काय दिलं उत्तर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 16:51 IST

या वेळी भाजपला तृणमूल काँग्रेसचा खास प्रतिस्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही पक्ष एक-मेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोलकाता - विधानसभा निवडणूक प्रचाराने पश्चिम बंगाल (West Bengal) पार ढवळून निघाला आहे. या वेळी भाजपला (BJP) तृणमूल काँग्रेसचा (TMC) खास प्रतिस्पर्धक म्हणून पाहिले जात आहे. दोन्ही पक्ष एक-मेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे भाजप टीएमसीला सातत्याने भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या मुद्द्यावर घेरत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने भाजपच्या बंगालमधील प्रवेशाला 'बंगाली' विरुद्ध 'बाहरी', असा मुद्दा बनवले आहे. यातच गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एका टीव्ही चॅनलवर स्वतः बाहेरील असल्याशी संबंधित एका प्रश्नावर उत्तर दिले आहे. (Union home minister Amit Shah's reaction on the questioned about buying house in west bengal)

अमित शाह यांना एबीपी न्यूजच्या (बंगाली वाहिनी) अँकरने विचारले, “बंगालमध्ये एक म्हण आहे, 'डेली पॅसेन्जर' अर्थात रोज एकाच ठिकाणी जाणे. तर आपला पश्चिम बंगाल दौरा आठवड्यातून किमान दोन दिवस अथवा कधी-कधी तीन दिवसही असतो. मग आपण तर येथे एक घर अथवा फ्लॅट विकत घ्यायला हवा. आम्हालाही म्हणता येईल, की देशाच्या गृह मंत्र्यांचे बंगालमध्ये घर आहे आणि आपले विरोधकही आपल्याला 'बाहरी' म्हणू शकणार नाहीत.”

नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

पत्रकाराच्या या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, बाहेरील असल्याचाच प्रश्न असेल, तर माझा पक्ष अखिल भारतीय पक्ष आहे. माझा पक्ष स्थानिक पक्ष नाही. तर मग माझ्या पक्षाचे सर्वच नेते ममता दीदींच्या मते बाहेरीलच झाले. तर मी त्यांना एक छोटा प्रश्न विचारू इच्छितो, की सुभाष बाबू जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा ते गुजरातसाठी बाहेरील होते का? प्रणव मुकर्जी देशाचे राष्ट्रपती झाले, तर ते मध्य प्रदेशसाठी बाहेरील होते का? हा कसला संकुचित विचार आहे, हा बंगालचा विचार असू शकत नाही. हा अत्यंत संकुचित विचार आहे.

आपल्या बंगाल दौऱ्याच्या प्रश्नावर शाह म्हणाले - “जर माझ्याच दौऱ्याचा प्रश्न असेल, तर बंगालमध्ये आम्ही सर्वाधिक जागांवर निवडणूक लढत आहोत. यामुळे मी येथे अधिक वेळा येणे साहजिकच आहे. पण मला कळत नाही, की मी येथे आल्याने दीदींना काय त्रास होतो?" असा सवालही शाह यांनी यावेळी केला. 

ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा: अमित शाहममता सरकारमध्ये 115 घोटाळे -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यापूर्वी, पुरुलिया जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी ममतांवर जोरदार निशाणा साधला होता. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असा निशाणा अमित शाह यांनी ममतांवर साधला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१