शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

"ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू, त्यांना मशिदीत की मंदिरात जायचं हे समजत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 4:19 PM

Giriraj Singh Attack on Mamata Benerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी "भाजपाने हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये. मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते" असं म्हटलं आहे. नंदीग्राम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं होतं. यावरून आता ममतांवर निशाणा साधण्यात आला आहे. "निवडणुकीपुरत्या हिंदू" असल्याचं म्हणत बोचरी टीका करण्यात आली आहे. 

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू आहेत. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या दडपणाखाली या स्तोत्रांचा जप केला आहे. आज दीदी चंदीपाठाचे पठण करीत आहेत. ही निवडणूक तुम्हाला काय काय करायला लावत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी जरा घाबरल्या आहेत आणि त्यांना मशिदीत जायचं की मंदिरात जायचं हे समजत नाही असं देखील म्हटलं आहे. 

गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. दक्षिण 24 परगनामधील सतगछिया येथून तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा (Sonali Guha)तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. "ममता दीदी मला सोडू शकतात तर मी का नाही? मी मुकुल रॉय यांच्याशी बोलले आहे की, मी निवडणूक लढणार नाही पण मला एक सन्माननीय पद हवं आहे. गुहा यांनी सांगितले की रॉय यांनी आपली मागणी मान्य आहे. मी नक्कीच भाजपमध्ये प्रवेश करेन" असं सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे. 

'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, आमदार सोनाली गुहा भाजपामध्ये करणार प्रवेश

सोनाली गुहा या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळच्या सहकारी होत्या. मात्र तृणमूल काँग्रेसकडून यंदा गुहा यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तृणमूलकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर सोनाली गुहा यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळलं होतं. "देव ममता बॅनर्जींनी सदबुद्धी देवो. मी ममता बॅनर्जींना सुरुवातीपासून साथ दिली आहे. मला माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. मी एक राजकीय व्यक्ती म्हणून निष्क्रिय बसू शकत नाही" असं देखील सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे.

खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तब्बल 200 गावठी बॉम्ब सापडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातून पोलिसांनी जवळपास 200 गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. काशीपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या बॉम्बचा वापर कुठे होणार होता, याचा शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी दक्षिण 24 परगणा येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तर पाच कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कोलकातातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शोवन देबनाथ, विक्रम शील, स्वपन कुराली, महादेव नाइक, अर्पण देबनाथ अशी जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. शुक्रवारी जेवण करत असतानाच आमच्यावर कोणीतरी बॉम्ब फेकले, असा दावा जखमी झालेल्या एका कार्यकर्त्याने केला आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारण