नवी दिल्ली: संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदी सरकारला जोरदार धक्का बसला आहे. संसेदतल्या प्रस्तावित कृषी विधेयकांवरून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडली आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कौर मोदी सरकारमध्ये खाद्य प्रक्रिया मंत्री होत्या. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या त्या शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.प्रस्तावित कृषी विधेयकांना शिरोमणी अकाली दल विरोध करणार असल्याचं सुखबीर सिंह बादल यांनी आजच लोकसभेतल्या भाषणात म्हटलं होतं. 'तीन कृषी विधेयकांचा थेट परिणाम पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर होणार आहे. ३० हजार अडते, कृषी बाजारपेठेतील ३ लाख मजुरांना विधेयकामुळे फटका बसणार आहे,' असं बादल म्हणाले होते. तेव्हाच अकाली दल सरकारमधून बाहेर पडणार हे स्पष्ट झालं होतं.
मोदी सरकारला धक्का; शिवसेनेपाठोपाठ आणखी एक पक्ष बाहेर, मंत्र्याचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 9:08 PM