नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 11:04 AM2021-02-20T11:04:29+5:302021-02-20T11:07:03+5:30
Air India : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकरला मिळाला विमानात प्रवेश, करण्यात आली होती पैशांची मागणी
भारताची ऑलिंम्पियन नेमबाज मनू भाकर हिला कथितरित्या एअर इंडियाच्याविमानात प्रवेशापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी आपल्यासोबत आवश्यक ती वस्तू तिच्याजवळ असल्यानं तिला प्रवेश नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नेमबाजीसाठी आवश्यक असलेलं शस्त्र नेण्यासाठी तिच्याकडे परवानगी असतानाही तिच्याकडून १० हजार रूपयांची मागणी करण्यात आली. तसंच ही रक्कम न दिल्यामुळे तिला विमानात प्रवेश नाकारण्यात आला. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकर हिला विमानात जाण्याची परवानगी देण्यात आली.
मनू भाकर हिनं शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरवर दिल्ली विमानतळावरील एक फोटो शेअर केला. "मला IGI विमानतळावर AI 437 या विमानात प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि १०,२०० रूपयांची मागणीही केली जात आहे. माझ्याकडे सर्व आवश्यक ती कागदपत्रे आहेत आणि DGP परमिटही आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी मनोज गुप्ता आणि अन्य कर्मचारी माझा अपमान करत आहेत. कारण माझ्याकडे बंदूक आणि काडतुसे आहेत. किरेन रिजीजू, हरदीप सिंग पुरी सर मी तुमची प्रतीक्षा करत आहे," असं मनू भाकर हिनं आपल्या फोटोसह लिहिलं.
IGI Delhi .Going to Bhopal (MP Shooting Acadmy
— Manu Bhaker (@realmanubhaker) February 19, 2021
For my training i need to carry weapons and ammunition, Request @airindiain Officials to give little respect or at least don’t Insult players every time &please don’t ask money. I Have @DGCAIndia permit @HardeepSPuri@VasundharaBJPpic.twitter.com/hYO8nVcW0z
Thank you @KirenRijiju sir. Got boarded after strong support from all of you.
— Manu Bhaker (@realmanubhaker) February 19, 2021
Thank you India. jai hind
"कमीतकमी प्रत्येक वेळी तरी खेळाडूंचा अपमान करून नका आणि कृपया पैसेही मागू नका," असंही तिनं म्हटलं. यावेळी तिनं कथितरित्या त्रास देत असलेल्या अधिकाऱ्याचाही फोटो शेअर केला. "मनोज गुप्ता आणि त्यांचे सुरक्षा प्रभारी माझ्यासोबत गुन्हेगार असल्यासारखं वागत आहेत. अशा लोकांना कसं वागायचं याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. विमान उड्डाण मंत्रालय याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करते," असंही मनू भाकरनं म्हटलं. यानंतर किरेनं रिजीजू यांच्या मदतीनंतर तिला विमानात प्रवेश देण्यात आला. यावर तिनं किरेन रिजीजू यांचे आभार मानले. तसंच मनू भाकर तू देशाचा अभिमान आहेस, असंही ते म्हणाले.