पाटणा - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आज बिहारमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानादरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकली. त्यामुळे हेलिकॉप्टरची पाती तुटली. हा अपघात घडला तेव्हा रविशंकर प्रसाद यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून मंगल पांडेय आणि संझय झा हे प्रवास करत होते.रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला. पाटणा विमानतळावर हेलिकॉप्टर उतरत असताना रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरच्या पंख्याची पाती बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला अडकली.या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचा पंखा तुटला. मात्र सुदैवाने या अपघातात रविशंकर प्रसाद यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले मंगल पांडेय आणि संझय झा हेसुद्धा सुरक्षित आहेत. दरम्यान, आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी या अपघातानंतर सांगितले.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान पंख्याचे पाते तारेत अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 8:52 PM
Ravi Shankar Prasad News : रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला.
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आज बिहारमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावलेरविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकली. त्यामुळे हेलिकॉप्टरची पाती तुटलीअपघात घडला तेव्हा रविशंकर प्रसाद यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून मंगल पांडेय आणि संझय झा हे प्रवास करत होते