शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

"मोदी आणि योगींना मुलं नाहीत, तुमच्याकडून घेऊन ते कुणाला काय देतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 9:20 PM

वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देकृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत - भाजपचा दावाकुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू - भाजपचा इशाराआमच्या नेत्यांमागे कोणीच नाही, ते कुणाला काय देऊन जातील - संजीव बलियान

मुजफ्फरनगर : वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (union minister sanjeev balyan criticized opposition leaders over farm laws)

कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारसह पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांकडून टीका आणि आरोप केले जात आहेत. संजीव बलियान यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. आमच्या नेत्यांमागे कोणीच नाही. ते कुणाला काय देऊन जातील, असे संजीव बलियान यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं

मोदी आणि योगींना मुलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना मुलं-बाळं नाहीत. यामुळे ते कोणाला काय देणार. मात्र, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. भ्रष्टाचार करून आणि खाऊन तुमची पोटं भरली आहेत, अशा शब्दांत संजीव बलियानी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

कृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत

ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, तेच लोकं शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी कायद्यांवरून सतत शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. शेतकर्‍यांना घाबरवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा बलियान यांनी यावेळी केला. 

प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा

कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू

विरोधकांचा कट शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीवर कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू, असा इशारा देत पंतप्रधान मोदी आणि मुख्यंत्री योगी आदित्यनाथ हे गरीब कुटुंबातून आले आहेत. कृषी कायद्यामुळे शेतीतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास संजीव बलियान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश