नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आठही केंद्रीय मंत्र्यांना दोन-दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत काही केंद्रीय मंत्र्यांच्या बुधवारी भेटी घेतल्या.भाजपने ४५ पेक्षा अधिक मतदारसंघात विजय संपादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बारामतीची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविली आहे.
प्रत्येक मंत्र्यांकडे २ मतदारसंघ
राज्यातील इतर मतदारसंघांची जबाबदारी राज्यातील आठ केंद्रीय मंत्र्यांवर सोपविली जाणार आहे. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांकडे राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. यासंदर्भात सविस्तर बैठक काही दिवसांनी मुंबईत होणार असून यावेळी आठही केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.