ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - देशभरात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यानंतर पुढे पाच दिवस वेगवेगळे उत्सव साजरा होत असतात. दुसऱ्या दिवशी धुळवड असल्यानं अनेक जण या होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. मात्र उत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे होळी पेटवणे. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात उष्णता देणाऱ्या अग्नीचं केलेलं स्वागत असून, त्यानंतरच वसंत ॠतूचे आगमन होते.देशभरात साज-या होणा-या होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातोय. वेगवेगळ्या देशात भारतीय लोक होळीच्या दिवशी रंगांची उधळण करतात. अशात गुगल मागे राहिलं असतं तर नवलच म्हणायचं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुगलनं स्पेशल डुडल तयार करून लहानग्यांसोबत होळी खेळली आहे. गुगलचं पेज ओपन केल्यानंतर रंगात न्हाऊन निघालेलं डुडल नजरेस पडतं. गुगलवर लहानग्यांची टोळी रंगांची उधळण करत असल्याचं या डुडलमधून पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे गुगलकडून या डुडलचा एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहे. त्यात सर्वांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. व्हिडीओत लिहिलं आहे की, आम्ही होळीच्या शुभेच्छा देतोय, हिंदूंचा होळीचा सण भारत आणि नेपाळमध्ये मोठ्या उत्साहास साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला 2017 या वर्षांत प्रेम आणि शांती नांदत राहण्याच्या शुभेच्छा देतो.(गुगल डुडलवर झळकले डॉ. आंबेडकर)तत्पूर्वी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीदिनी मंगळवारी गुगलने होमपेजवर विशेष डुडलच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले होते. भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, प्रमुख सण, घटना, व्यक्ती यांना गुगलने नेहमीच विशेष डुडलच्या माध्यमातून सन्मान दिला गेला होता.
लहानग्यांसोबत गुगल डुडलची अनोखी होळी
By admin | Published: March 13, 2017 7:44 AM