ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली. दि. 2- भारताच्या ताब्यात असलेल्या इटलीच्या नौसैनिकांना सोडून द्यावा, असा निकाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. चार वर्षांहून अधिक काळ दिल्लीत शिक्षा भोगलेल्या या इटालियन नौसैनिकांना आता माघारी परतण्याची परवानगी दिल्याची माहिती इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.
भारतानं 2012ला दोन नौसैनिकांना सागरी चाचे समजून भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याप्रकरणी अटक केली होती. ऑइल टँकरच्या सुरक्षेच्या गस्तीवर असताना गैरसमजातून भारतीय मच्छीमारांना मारण्यात आलं होतं. एका नौसैनिकाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे इटलीला पाठवण्यात आलं आहे.
हे प्रकरण इटली आणि भारताच्या मध्ये होतं. मात्र दोन्ही देशांनी गेल्या वर्षी हे प्रकरण संयुक्त राष्ट्रसंघात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघानं या दोन्ही नौसैनिकांना सोडून देण्याचा निकाल दिला. त्या नौसैनिकांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.