शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

सत्तासंघर्षाचा निकाल आल्यावर एकजूट; विरोधकांचेही महाराष्ट्राकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:10 PM

विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार येणार

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करण्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना सावधपणे पावले टाकत आहेत. त्यांनी सर्वांना स्वीकारार्ह फॉर्म्युला तयार करण्यासाठी यापूर्वी दिल्लीत अरविंद केजरीवाल, कोलकातामध्ये ममता बॅनर्जी व लखनौमध्ये अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. 

जनता दल (यू)च्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, १३ मे रोजीच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर ऐक्याची प्रक्रिया वेग घेऊ शकेल. महाराष्ट्राशी संबंधित सुप्रीम कोर्टाचा फैसलाही १० मेच्या आसपास येण्याची शक्यता आहे. कारण न्या. एम. आर. शाह १४ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि ते या पीठात सहभागी आहेत. काही विरोधी पक्षांनी १९९६ च्या फॉर्म्युल्याचा सल्ला दिला आहे, असे समजते. त्यावेळी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती व नंतर संयुक्त मोर्चा उभारला होता. एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसला तेव्हा राजी करण्यात आले होते. दुसरा फॉर्म्युला २००४ सारखा आहे. त्यावेळी विरोधी पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती व यूपीएने स्थापन केलेले सरकार १० वर्षे चालले होते.

नेमके काय ठरले?नितीशकुमार बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप आघाडीच्या विरोधात आहेत व काँग्रेस केंद्रस्थानी असावा, अशी मते त्यांनी सार्वजनिकरीत्या मांडलेली आहेत. काँग्रेसला चार हात दूर ठेवल्यास अपेक्षित लक्ष्य साध्य करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीमध्ये वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक पक्षाला जागा वाटप करता येईल, असे त्यांना वाटते.विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, विरोधकांची पुढची बैठक पाटणा येथे घेण्यात यावी. तथापि, पश्चिम बंगालमध्ये त्यांना काँग्रेसशी हातमिळवणी करायची नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी