शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

विद्यापीठाचे मिशन ‘नॅक’

By admin | Published: September 11, 2014 12:57 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आधारावर नॅककडून ए ग्रेड भेटण्याची अपेक्षा करीत आहे. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. बुधवारी नॅक

काय मिळणार ? : अभ्यासक्रम, ग्रंथालय, फर्निचरसह लेटलतिफी बनली अडचण नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तयारीच्या आधारावर नॅककडून ए ग्रेड भेटण्याची अपेक्षा करीत आहे. परंतु त्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. बुधवारी नॅक कमिटीच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी ही बाब पुढे आली. ‘नॅक’ कमिटी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने नॅकचे निकष पूर्ण करण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवली नाही. परंतु दौऱ्याच्या सुरुवातीलाच एकामागून एक अशा अनेक त्रुट्या उघडकीस आल्या. संथ गतीने झालेली विकास कामे, अभ्यासक्रम अपडेट नसणे, विभागांच्या ग्रंथालयातील अनेक त्रुटी, वर्गांमध्ये तुटलेले व जुने फर्निचर, उद्यान व शैक्षणिक परिसरात उगवलेले जंगली गवत, वृक्षांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष आदीं बाबींकडे नॅकच्या दोन्ही चमूने नोटीस केल्या. तसेच विभागांच्या भेटी दरम्यान विभागप्रमुखांच्या लक्षातसुद्धा या गोष्टी आणून दिल्या. सूत्रांनुसार दौऱ्यादरम्यान नॅक सदस्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे विभागप्रमुखांजवळ नव्हती. काही विभागांकडे तर त्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रती सुद्धा नव्हत्या. वर्षभरातील कामकाज सादर करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही ठोस दस्तऐवज नव्हते. विभागप्रमुखांनी त्रुटी लपविण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले. यावर नॅक चमूने विभागांची कानउघाडणी सुद्धा केली. बुधवारी जेव्हा नॅक चमू विद्यापीठ शैक्षणिक परिसरात दाखल झाली. तेव्हा अनेक विभागांचे रंगरंगोटी व साफसफाईचे काम सुरू होते. मास कम्युनिकेशन, ललित कल विभाग, कॅम्पस ग्रंथालयसह अनेक विभागांची तयारी अजून सुरूच होती. सायंकाळपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)पहिल्या दिवशी शैक्षणिक विभागांना भेटी कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.एम. पठाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय अधिस्वीकृती व प्रत्यायन परिषदेच्या सात सदस्यीच चमूने बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सकाळी ९ वाजता भेट दिली. कुलगुरू अनुपकुमार यांनी चमुचे स्वागत केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, बीसीयुडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार, आयक्युएसी संचालक डॉ. सी.प. काणे, वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम उपस्थित होते. स्वागतांनतर कुलगुरुंनी विद्यापीठाच्या मागील चार वर्षाच्या कारकिर्दीतील वाटचालीचे पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. यानंतर नॅक चमूने दोन चमूमध्ये विभागणी करुन पाहणी केली. यात दोन्ही टीमने विद्यापीठ परिसरातील विविध स्नातकोत्तर शैक्षणिक विभागांची पाहणी केली.