युनिव्हर्सीटी कॉलेजेस इंटरॲक्शन सेल स्थापणार नवे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील : कौशल्य विकास केंद्राचे सुतोवाच
By admin | Published: October 26, 2016 11:55 PM
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, समुपदेशन, विकास उपक्रम, अनुदानासंबंधीचे मुद्दे याबाबत विद्यापीठात युनिव्हर्सीटी कॉलेजेस इंटरॲक्शन सेल स्थापन केला जाईल. या सेलमध्ये प्राचार्यांच्या बैठका घेतल्या जातील. त्यात आढावा, संवाद होईल, अशी घोषणा नवे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठात बुधवारी सकाळी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात केली.
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, समुपदेशन, विकास उपक्रम, अनुदानासंबंधीचे मुद्दे याबाबत विद्यापीठात युनिव्हर्सीटी कॉलेजेस इंटरॲक्शन सेल स्थापन केला जाईल. या सेलमध्ये प्राचार्यांच्या बैठका घेतल्या जातील. त्यात आढावा, संवाद होईल, अशी घोषणा नवे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठात बुधवारी सकाळी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात केली. अधिसभा सभागृहात त्यांचा सत्कार झाला. या वेळी त्यांची पत्नी अनिता पाटील, मुलगी तनया व इतर नातेवाइक उपस्थित होते. सोशल मीडियातील बातम्यांमुळे व्यथितमागील काही दिवसात आपल्याबद्दल सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्याबाबत व्यथित झालो आहे. विद्यापीठाची प्रतिमा मलीन व्हायला नको. याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही डॉ.पाटील म्हणाले. मी खेड्यातला, सर्व प्रश्नांची जाणिवमी अंजाळे या लहनशा गावातील आहे. मला सर्व प्रश्नांची जाणीव आहे. विद्यार्थी माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांना त्रास झाला तर मला सहन होणार नाही. विद्यार्थ्यांना आठवड्यातून अर्धा दिवस व कर्मचार्यांना अर्धा दिवस वेळ देऊन त्यांचे म्हणणे, समस्या ऐकून घेतल्या जातील, असेही कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले. कौशल्य विकास केंद्र सुरू करूविद्यापीठात कौशल्य विकास केंद्र सुरू करून विद्यार्थी केंद्री विषयांवर काम केले जाईल. कामाचे विकेंद्रीकरण करू. आढावा नियमित घेतला जाईल. कार्यक्षमता, पारदर्शकता याबाबत तडजोड करणार नाही. मी भूतकाळापेक्षा वर्तमानाला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करतो, असेही कुलगुरू यांनी सांगितले. पाचही कुलगुरूंचा उल्लेखकुलगुरू डॉ.पाटील यांनी मागील सर्व पाचही कुलगुरूंचा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यांच्यासोबत काम केल्याचा आनंद आहे, २५ वर्षे विद्यापीठात काम केल्याचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे, असेही डॉ.पाटील यांनी सांगितले. माझी शाळा पुस्तक स्मरणातपुणे येथे उच्च शिक्षण घेताना साने गुरुजी यांचे माझी शाळा पुस्तक वाचले. ते स्मरणात राहीले. माझे विद्यापीठ सुंदर करण्यासाठी मला सर्वांच्या मदतीची गरज असल्याचेही कुलगुरू म्हणाले. खाणार्यांकडून विद्यापीठ बांधले नाही- ठाकरेविद्यापीठ बांधत असताना पीडब्ल्यूडीकडून कामांचा विषय समोर आला, पण जे नेहमी खाण्याचेच काम करतात, त्यांच्याकडून मी विद्यापीठ बांधण्याचे काम केले नाही. कर्मचार्यांची मदत घेऊन विद्यापीठ बांधले. जादा काम करताना कर्मचार्यांनी जादा मोबदल्याची अपेक्षाही केली नाही, असे डॉ.एन.के.ठाकरे म्हणाले.