नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना सोमवारी रात्री जारी केल्या आहेत. तसेच अनलॉक-2 31 जुलैपर्यंत सुरू राहील, असेही स्पष्ट केले आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, 31 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये, कोचींग क्लासेल बंद राहतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो सर्व्हिस, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरही 31 जुलैपर्यंत निर्बंध राहतील.
या शिवाय, ज्या आंतरराष्ट्रीय विमानांना गृहमंत्रालयाने उड्डाणासाठी परवानगी दिली आहे, अशांना मात्र, यातून सूट असेल. तसेच अपवादात्मक स्थिती वगळता रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहील.
कंटेन्मेट झोनबाहेर काय सुरू काय बंद
- शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग इंस्टिट्यूट्स 31 जुलैपर्यंत बंद राहतील. याशिवाय ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंग सुरू राहील. केंद्र आणि राज्य सरकारांचे ट्रेनिंग इंस्टिट्यूट 15 जुलैपासून सुरू केले जाऊ शकतील. यासाठी स्वतंत्रपणे एसओपी जारी केली जाईल.
- ज्यांना गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे, केवळ अशाच प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करण्याची परवानगी असेल.
- मेट्रो सेवा, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, जीम,एंटर्टेन्मेंट पार्क, थिएटर्स, बार, ऑडिटोरिअम आणि असेम्बली हॉल, अशी ठिकाणे बंदच राहतील. तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रमांवर बंदी असेल.
- वरील सर्व कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी सध्या दिली जाणार नाही. यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे जारी केल्या जाऊ शकतात.
- या शिवाय, देशांतर्गत उड्डाणे आणि रेल्वे प्रवास काही अटी आणि शर्तींनुसार यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे. हेच पुढेही सुरू राहील.
रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी -
या काळात रात्री 10 वाल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत लोकांच्या बाहेर जाण्यावर बंदी असेल. याशिवाय आवश्यक सेवा, कंपन्यांतील शिफ्टमध्ये काम करणारे लोक, नॅशनल आणि स्टेट हायवेवर सामानाची ने-आन करणारी वाहने, कार्गोच्या लोडिंग आणि अनलोडिंगवर निर्बंध लागू असणार नाहीत.
तसेच बसेस, रेल्वे आणि विमानांतून उतरल्यानंतर लोकांना घरी जाण्याची परवानगी असेल. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी स्थानिक प्रशासनाला कलम 144 लागू करण्यासारखे आदेश जारी करता येतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या -
कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं
Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार