नवी दिल्लीः देशावर कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मोदी सरकारनं देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत.अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे मोदी सरकारनं प्रवासावर घालण्यात आलेले निर्बंधही हटवले आहेत. राज्याबाहेरील किंवा राज्यांतर्गत वाहतूक खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. पण तरीही राज्य सरकारच्या निर्णयाची आता सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. ठाकरे सरकारनं या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला तरच ई-पासशिवाय राज्यात प्रवास करणं शक्य होणार आहे.
राज्यांतर्गत वा राज्या-राज्यांत सर्व दळणवळणावर आता कोणतीही बंदी नाही. कसलीही परवानगी किंवा मंजुरी व ई-परमिटची गरज नाही. दळणवळणासंबंधीच्या निर्णयाचे राज्यांना अंतिम अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रे राज्यांनाच ठरवता येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच केंद्र सरकार हे राज्य सरकारांशी विचारविनिमय करून शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय जुलैमध्ये घेऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊनची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत पुढे वाढवण्यात आला होता. त्यात वाढ करून तो तीन मेपर्यंत पुढे वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला. आता पाचव्या टप्प्यात 1 जून ते 30 जूनपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा!
Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार
Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी
जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार
CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...