नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने केलेला लॉकडाऊन उठविण्याच्या चौथ्या टप्प्याची आज घोषणा झाली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंचत कडक लॉकडाऊन सुरुच राहणार आहे.
याचबरोबर येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी, ई परमीट, ईपासची गरज राहणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच या काळात सोशल डिस्टन्सिंग, दुकांनांमध्ये गाहकांमधील योग्य अंतरा पाळावे लागणार आहे.
शाळांबाबत काय? नववी ते बारावीचे विद्यार्थी त्यांच्या शाळांमध्ये जाऊ शकणार आहेत. ही सूट केवळ कंटेनमेंट झोनमध्ये नसलेल्या शाळा आणि विद्यार्थ्य़ांना देण्यात आली आहे. हे विद्यार्थी केवळ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकणार आहेत. यासाठी त्या विद्यार्थांच्या पालकांची लेखी संमती लागणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आदी कार्यक्रमांना 100 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी 21 सप्टेंबरपासून पुढे मिळणार आहे.
राज्य सरकारांना आदेशराज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय कंटेनमेंट झोनच्या बाहेरील कोणत्याही क्षेत्रात (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी) संपूर्ण लॉकडाऊन लागू करू नये असे आदेश काढण्यात आले आहेत.