गोरखपूर : आज देशभरात लॉकडाऊन उठविण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, त्यांनी आईला पत्र लिहून वडिलांच्या अंत्यविधीला येऊ शकत नसल्याचे कळविले होते. आज लॉकडाऊन उठविण्य़ाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे.
आजपासून ऑफिसेस, मंदिरे उघडण्यात आली आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत काम तसेच देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी मंदिरांचे दरवाजे उघडण्य़ात आले. यावेळी भाविकांनी रांगेत परंतू सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घेतले.
योगी आदित्यनाथांनीही आज सकाळी गोरखनाख मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लॉकडाऊननंतर प्रशासकीय कामे वगळता आदित्यनाथ बाहेर पडले नव्हते. अगदी वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही जाण्याचे त्यांनी टाळले होते. कारण यामुळे अधिकारी आणि नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा आणि त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी आईला पत्र लिहून तसे कळविले होते.