नवी दिल्ली - उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री राघवेंद्र प्रताप सिंह यांनी उन्नव बलात्कार प्रकरणातील पीडितेला पेटवून देण्याच्या घटनेला असंवेदनशील म्हटले आहे. तसेच शंभर टक्के गुन्हेगारी संपविण्याची हमी तर प्रभू रामचंद्रही घेऊ शकत नाही, असे अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मंत्री राघवेंद्र सिंह बाराबंकी जिल्ह्यात आढावा बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गुन्हे प्रत्येक सरकारमध्ये होत असतात. मात्र आमच्या सरकारच्या कार्यकाळात दोषींवर वेळीच कारवाई करण्यात येते. गुन्हेगारांनी आम्ही कारागृहात पाठवल्याचे ते म्हणाले.
केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील योगी सरकारमध्ये आरोपींना संरक्षण मिळत नाही. याआधीच्या सरकारमध्ये गुन्हेगारीवर कुणाचाही अंकूश नव्हता. यापुढे कोणताही गुन्हा केला तर गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळणार, असंही राघवेंद्र सिंह यांनी नमूद केले. उन्नावमध्ये काय घडल
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये सामूहिका बलात्कार प्रकरणी जामीनावर सुटलेल्या आरोपींनी गुरुवातील पीडित मुलीला पेटून दिल्याची घटना घडली. पोलिसांनी पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये शिवम त्रिवेदी त्याचे वडील रामकिशोर, शुभम त्रिवेदी, हरिशंकर, आणि उमेश बाजपेयी यांचा समावेश आहे.