लखनौ - उन्नावमधील युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर बुधवारी रात्री एसएसपींच्या निवासस्थानावरून आत्मसमर्पण न करताच माघारी परतले होते.
या सामूहिक बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उन्नाव येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर बुधवारी रात्री आत्मसमर्पण करणास असल्याचे वृत्त आले होते. मात्र प्रत्यक्षात ते आत्मसमर्पण न करताच ते एसएसपींच्या निवासस्थानातून माघारी परतले. मात्र एसएसपी हे उपस्थित नसल्याने आपण माघारी जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.