ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आम आदमी पक्षाला मिळालेल्या पदरेशी निधीबाबत माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. काल रात्री त्यांना अनोळखी क्रमांकावरु धमकीचे फोन आल्याचे वृत्त होते. उपोषणाला बसल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझा मृत्यू झाला तरी केजरीवालांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र हे प्रकरण देशाच्या चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही मिश्रा यांनी यावेळी केला.पुढे बोलताना मिश्रा म्हणाले की. आप मधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवास खर्चाबाबत माहिती मिळेपर्यंत मी उपोषण करणार आहे. हे धरणे नसून सत्याग्रह आहे. आपचे नेते सत्येंद्र जैन, आशिष खेतान, राघव चढ्ढा, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्या परदेशी दौऱ्याची माहिती जाहीर करावी, असा संदेश अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. तुम्ही म्हणता की तुमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठीही पैसे नाहीत. मग विदेश दौऱ्यासाठी पैसे कुठूण आले. याबाबतची माहिती देण्यास केवळ पाच मिनिटांचा वेळ लागेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी केला होता.
तो पर्यंत मी उपोषणाला बसणार - कपिल मिश्रा
By admin | Published: May 10, 2017 1:32 PM