…तोपर्यंत नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेर काढणं कठीण; रणनीतीकार प्रशांत किशोरनं ठेवला काँग्रेससमोर ‘प्लॅन’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 03:31 PM2022-03-27T15:31:27+5:302022-03-27T15:32:06+5:30

२०१४ पासून काँग्रेस या राज्यात ९० टक्के जागा पराभूत होत आहे. प्रशांत किशोर यांच्या प्लॅनिंगनुसार, हे नुकसान ५० टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते.

Until then, it is difficult to remove Narendra Modi from power; Strategist Prashant Kishor puts 'plan' in front of Congress | …तोपर्यंत नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेर काढणं कठीण; रणनीतीकार प्रशांत किशोरनं ठेवला काँग्रेससमोर ‘प्लॅन’

…तोपर्यंत नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेर काढणं कठीण; रणनीतीकार प्रशांत किशोरनं ठेवला काँग्रेससमोर ‘प्लॅन’

Next

नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस(Congress) यांच्यातील जुगलबंदी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्याचे निकाल समोर येत नाहीत. तोवर काँग्रेसमध्येप्रशांत किशोर यांच्या प्रवेशावर हायकमांडनं वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र आता विधानसभा निकालानंतर या दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्याची कुजबुज आहे.

प्रशांत किशोर यांना २०२४ च्या पूर्वी होणाऱ्या कुठल्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यात रस नाही. काँग्रेसमध्ये नेते म्हणून प्रशांत किशोर(Prashant Kishore) पूर्णवेळ भूमिका निभावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तयार करण्याची त्यांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी, शरद पवार(Sharad Pawar), एम के स्टालिन, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव, हेमंत सोरेन, जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत प्रशांत किशोर यांचे चांगले संबंध असल्याचं जगजाहीर आहे.

...तोपर्यंत मोदींना सत्तेबाहेर काढणं कठीण

भारतात निवडणुकीच्या रणनीतीत यशस्वी ठरलेले प्रशांत किशोर यांचं मत आहे की, जोपर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल, महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, झारखंड या राज्यांत भाजपाचा काँग्रेसशी थेट मुकाबला आहे. तिथे काँग्रेस भाजपाला हरवण्यास सुरूवात करत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारला सत्तेबाहेर काढण्याचा विरोधी पक्षाचा आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. काँग्रेसला २०० हून अधिक लोकसभा जागांवर प्राधान्य देण्याची गरज आहे जिथे त्यांची थेट लढत भाजपाशी आहे असं त्यांनी सांगितले.

२०१४ पासून काँग्रेस या राज्यात ९० टक्के जागा पराभूत होत आहे. प्रशांत किशोर यांच्या प्लॅनिंगनुसार, हे नुकसान ५० टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. काँग्रेसला प्रत्येक २ जागांपैकी १ जागेवर विजय मिळवावा लागेल. तरच विरोधी पक्षाची ताकद वाढेल. त्यांच्या अपेक्षा वाढतील. २०१६ पासून गांधी आणि प्रशांत किशोर एकमेकांच्या संपर्कात आले. प्रशांत किशोर यांना देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी २ अडचणी आहेत. सर्वात आधी गांधी कुटुंबाहून जास्त महत्त्व असणाऱ्या व्यक्तीला पक्षात समोर ठेवण्याची सवय नाही. बंगाल आणि अन्य ठिकाणी प्रशांत किशोर यांनी त्यांच्या विजयी कामगिरीमुळे एका वेगळ्या उंचीवर ठेवले आहे. दुसरा मुद्दा म्हणजे प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर फेरफदल करण्याची इच्छा आहे. मात्र गांधी कुटुंब यास तयार नाही. G23 नेते प्रशांत किशोर यांच्या सूचनेवर सकारात्मक आहेत. मात्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता पुन्हा काँग्रेस हायकमांड आणि प्रशांत किशोर यांच्यात पुन्हा संवाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्व सुधारणेच्या दिशेने पाऊल टाकण्यास तयार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

Web Title: Until then, it is difficult to remove Narendra Modi from power; Strategist Prashant Kishor puts 'plan' in front of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.