ऑनलाइन लोकमत
कोईम्बतूर, दि. 24 - महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील ईशा योग केंद्रात भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी ईशा फाउंडेशनचे संस्थापक योगगुरु जग्गी वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि भाविक उपस्थित होते. भारताने जगाला योगाची भेट दिली आहे. योगामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते. एखादी संकल्पना केवळ ती प्राचीन आहे म्हणून नाकारणे घातक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
ईशा फाउंडेशनतर्फे भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. ही मूर्ती दगडाऐवजी स्टीलचे तुकडे जोडून तयार करण्यात आली आहे. तसेच, येथील नंदीची मूर्तीही तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसेच मातीपासून बनविण्यात आली आहे.
PM Modi unveils 112 foot tall Shiva statue in Coimbatore, Tamil Nadu. pic.twitter.com/u8j7a7Qhp9— ANI (@ANI_news) February 24, 2017
India has given the gift of Yoga to the world, by practising Yoga a spirit of oneness is created:PM Modi pic.twitter.com/eml9K7N9VF— ANI (@ANI_news) February 24, 2017
Rejecting an idea just because its ancient, can be potentially harmful: PM Modi in Coimbatore pic.twitter.com/1R6PXd6JHa— ANI (@ANI_news) February 24, 2017