महात्मा गांधीजींच्या नुतनीकरण केलेल्या पुतळ्याचे अनावरण, दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण
By वसंत भोसले | Updated: December 26, 2024 19:40 IST2024-12-26T19:39:01+5:302024-12-26T19:40:07+5:30
काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रम

महात्मा गांधीजींच्या नुतनीकरण केलेल्या पुतळ्याचे अनावरण, दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण
राम मगदूम, लोकमत न्यूज नेटवर्क, बेळगाव: १९२४ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली येथील व टिळकवाडीतील वीरसौध परिसरात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवानिमित्त तेथील गांधींजींच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे अनावरण आणि दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.
महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते तर छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते झाले.त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी वीरसौध वास्तूतील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बैठ्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ तथा राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, माहिती खात्याचे सचिव कामेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.