UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का; गांधी घराण्याचे दोन पारंपरिक मतदारसंघही धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:00 AM2022-03-10T11:00:29+5:302022-03-10T11:00:42+5:30
Assembly Election Results 2022: उत्तर प्रदेशच्या निवडणूकीच्या पहिल्या कलानूसार, काँग्रसेला धक्का बसलाच आहे.
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास दोन तासांनंतर ३८३ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २५० जागांसह आघाडीवर आहे. तर सपा १२१ जागा, बसप ०५, काँग्रेस ०४ आणि अन्य ०३ वर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणूकीच्या पहिल्या कलानूसार, काँग्रसेला धक्का बसलाच आहे. मात्र गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जात आहे.
देशभरात ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. सुरुवातीच्या मतमोजणी निकालात भाजपाला उत्तर प्रदेश, गोव्यात बहुमत मिळत असल्याचं दिसून येते. तर पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसची अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दाणादाण उडवली आहे. पंजाबमध्ये ‘आप’ बहुमत मिळवेल अशी चिन्हे आहेत. तर मणिपूरमध्येही भाजपा बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. उत्तराखंडमध्येही भाजपा सत्ता राखण्याची शक्यता आहे.
करून दाखवलं! भाजपची १०० नंबरी कामगिरी; मोदी-शाहांची रणनीती विरोधकांवर पडली भारी #AssemblyElections2022#ElectionsWithLokmathttps://t.co/p9j3bzZ0C7
— Lokmat (@lokmat) March 10, 2022
दरम्यान, देशामध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण ४०३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मणिपूरमध्ये ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात ४० जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये ११७ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.