लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) काँग्रेसला (Congress)मोठा धक्का बसला आहे. बरेली कँटमधील (Bareilly Cantt) काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया आरोन (Supriya Aron) यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सुप्रिया आरोन यांना पार्टीचे सदस्यत्व दिले आहे. सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले.
यावेळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुप्रिया आरोन यांचे स्वागत केले. म्हणाले की, सुप्रिया आरोन यांचे समाजवादी पार्टीत स्वागत आहे. त्या बाहेरून समाजवादी पार्टीत आलेल्या नाहीत, त्या पूर्वी समाजवादी पार्टीमध्ये होत्या. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सरकार स्थापन होणार आहे. लोक समाजवादी पार्टीकडे पाहात आहेत.
अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी काही निर्णय घेतले आहेत. समाजवादी पार्टीने नवीन वर्षात उत्तर प्रदेशात सरकार आल्यास 300 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाणार आहे. मागील सरकारमध्येही आम्ही लॅपटॉपचे वाटप केले होते, प्रत्येक लॅपटॉपची स्वतःची कहानी आहे, ज्याला लॅपटॉप मिळाला त्याला खूप मदत मिळाली, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.\
याचबरोबर, आज 22 तारीख आहे. आमचा घोषणा आहे, 22 मध्ये सायकल. जर सरकार स्थापन झाले तर आम्ही 22 लाख नोकऱ्या आणि यूपीच्या तरुणांना फक्त आयटी क्षेत्रात रोजगार देऊ. आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. यूपीमध्ये आयटी हब बनवण्यात येणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोलवर अखिलेश यादव म्हणाले की, सर्व सर्वेक्षणे फेल होतील. भाजपाच्या आमदारांना गावोगावी जाता येत नाही. भाजपाचा पराभव होणार आहे. ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या डबल इंजिन सरकारने काहीही केले नाही. त्यांना विचारा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टसाठी किती निधी दिला? बरेली, मुरादाबाद, पिलीभीत आणि फिरोजाबादसाठी तुम्ही काय केले? असे सवाल अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला.
काँग्रेसकडून पहिल्या यादीत 50 महिलांना उमेदवारीदरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी (Congress First List) जाहीर केली आहे. काँग्रेसच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत 50 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी "आमच्या 125 उमेदवारांच्या यादीमध्ये 40 टक्के महिला आणि 40 टक्के तरुणवर्ग आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे आणि आम्हाला राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात करायची आहे," असं प्रियंका गांधी म्हणाल्या. दरम्यान, या महिलांमध्ये काँग्रेसकडून यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे.