कानपूर: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्व पक्षाचे उमेदवार आपला जोरदार प्रचार करत आहेत. पण, यात भाजपच्या अनेक उमेदवारांना प्रचारादरम्यान नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. भाजपचे उमेदवार सहेंद्र रमला यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
कार्यकर्त्यांना मारहाणभाजपचे उमेदवार सहेंद्र रामला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सहेंद्र रामला यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. पण, सहेंद्र रमला यांच्या काही समर्थकांवर दगडफेक करण्यात आणि मारहाण करण्यात आली आहे. सहेंद्र रामला हे बागपत जिल्ह्यातील छपरौली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. छपरौली शहरात रोड शो दरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.
आमदाराची कारवाईची मागणीया घटनेनंतर विद्यमान आमदार सहेंद्र रामाला यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. आमदार म्हणतात की, विरोधक त्यांच्या सार्वजनिक समर्थनामुळे संतापले आहेत. यामुळेच विरोधकांकडून काही समाजकंटकांना बळ देऊन आमच्यावर हल्ले केले जात आहेत. सहेंद्र रामाला यांच्याविरोधात समाजवादी पार्टीने अजय कुमार यांना उमेदवारी दिली आहे.
यूपीत सात टप्प्यात मतदानयूपी विधानसभेसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात छपरौलीसह पश्चिम उत्तर प्रदेशातील जागांवर मतदान होणार आहे. यूपीमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि सातवा टप्पा 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहेत.