शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचे योगदान असल्याचे म्हटले आहे. राऊत म्हणाले, "भाजपला मोठा विजय मिळा आहे, उत्तर प्रदेश त्यांचे राज्य होते. तरीही अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचे योगदान आहे. या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावा लागेल. आम्ही खुश आहोत, हार-जीत होतच असेत. आपल्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत."
यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या पंजाबमधील पराभवावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "आपण आम्हाला सातत्याने विचारत आहात की शिवसेनेला उत्तर प्रदेशात किती जागा मिळाल्या? यूपीत काँग्रेस आणि शिवसेनेची जी स्थिती झाली, त्याहून अधिक वाईट स्थिती तुमची पंजाबमध्ये झाली आहेत. यासंदर्भातही आपण देशाला मार्गदर्शन करा. चिंतेचा विषय म्हणजे, पंजाबमध्ये भाजप, जो एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याला तेथील जनतेनं पूर्णपणे नाकारलं आहे. पीएम मोदी, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनीही तेथे जाऊन जबरदस्त प्रचार केला, तरीही भाजपचा पराभव का झाला?"
यावेळी, उत्तराखंडमध्ये भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव का झाला? गोव्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा पराभव झाला. पंजाबच्या जनतेने तर भाजपच नाकारला, याचे उत्तर आधी भाजप नेत्यांनी द्यायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.
फडणवीस म्हणाले- सेना म्हणजे 'बीजेपी सेना', शिवसेना नाही... -तर दुसरी के, सेना म्हणजे शिवसेना नाही, तर 'भाजप सेना' असा आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. ते म्हणाले, "शिवसेनेची लढाई NOTA सोबत आहे, भाजपशी नाही...(गोव्यात) राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मते NOTA पेक्षा कमी आहेत. प्रमोद यांना खाली आणल्याचा दावा करणारे सावंत स्वतः पराभूत झाले आहेत. आता लढत मुंबई महापालिकेची. आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात नाही, आम्ही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, असे म्हणज 'उत्तर प्रदेश सिर्फ एक झांकी है, महाराष्ट्र अभी आना बाकी है, असेही फडणवीस म्हणाले."