UP Assembly Election 2022 Results : उत्तर प्रदेशात 'या' 20 VIP जागांवर सर्वांचे लक्ष; जाणून घ्या कोण आहेत याठिकाणी उमेदवार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:01 AM2022-03-10T10:01:22+5:302022-03-10T10:17:00+5:30
UP Assembly Election 2022 Results : एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले, तर अनेक व्हीआयपी जागांवर काहींना सहज विजय मिळण्याची शक्यता आहे, तर अनेकांसाठी चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Elections) मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपा युतीचे सरकार राज्यात येईल, असे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, यूपीमध्ये काही हाय-प्रोफाइल जागा (UP High-Profile Seats) आहेत, ज्यावर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.
यामध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची गोरखपूर सदर जागा (Gorakhpur Sadar Seat), समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची करहल जागा (Karhal Seat), उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची सिरथू जागा आणि भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची फाजिलनगर जागा सुद्धा समावेश आहे.
एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले, तर अनेक व्हीआयपी जागांवर काहींना सहज विजय मिळण्याची शक्यता आहे, तर अनेकांसाठी चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदाहरणार्थ, केशव प्रसाद मौर्य यांच्या सिरथू जागेवर चुरशीची लढत आहे. येथे अपना दल कमरवाडीच्या पल्लवी पटेल समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. तसेच, अखिलेश यादव यांना करहल जागेवर भाजपाचे एसपी बघेल यांचे आव्हान आहे. त्याचवेळी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या फाजिलनगर जागेवरही पेच दिसत आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या जहूराबाद विधानसभेच्या जागेवर भाजपचे कालीचरण राजभर जोरदार लढत आहेत.
20 व्हीआयपी जागा
1. गोरखपूर सदर- योगी आदित्यनाथ
2. करहल- अखिलेश यादव
3. रामपूर - आझम खान
4. स्वार - अब्दुल्ला आझम
5. शहाजहानपूर - सुरेश खन्ना
6. बलिया - राम गोविंद चौधरी
7. आझमगड - दुर्गा प्रसाद यादव
8. सरधना - संगीत सोम
9. मथुरा - श्रीकांत शर्मा
10. महाराजपूर - सतीश महाना
11. मानकापूर - रमापती शास्त्री
12. बन्सी - जय प्रताप
13. मल्हानी सीट - धनंजय सिंह
14. मऊ सदर - अन्सारी
15. कुंडा - रघुराज प्रताप सिंह
16. अमेठी - संजय सिंह
17. संभल - इक्बाल महमूद
18. लखनऊ कॅंट - ब्रजेश पाठक
19. सिरथू - केशव प्रसाद मौर्य
20. जहूराबाद - ओमप्रकाश राजभर