शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

UP Assembly Election 2022 Results : उत्तर प्रदेशात 'या' 20 VIP जागांवर सर्वांचे लक्ष; जाणून घ्या कोण आहेत याठिकाणी उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:01 AM

UP Assembly Election 2022 Results : एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले, तर अनेक व्हीआयपी जागांवर काहींना सहज विजय मिळण्याची शक्यता आहे, तर अनेकांसाठी चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Elections) मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपा युतीचे सरकार राज्यात येईल, असे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, यूपीमध्ये काही हाय-प्रोफाइल जागा (UP High-Profile Seats) आहेत, ज्यावर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. 

यामध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची गोरखपूर सदर जागा (Gorakhpur Sadar Seat), समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची करहल जागा (Karhal Seat), उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची सिरथू जागा आणि भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची फाजिलनगर जागा सुद्धा समावेश आहे. 

एक्झिट पोलबद्दल बोलायचे झाले, तर अनेक व्हीआयपी जागांवर काहींना सहज विजय मिळण्याची शक्यता आहे, तर अनेकांसाठी चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदाहरणार्थ, केशव प्रसाद मौर्य यांच्या सिरथू जागेवर चुरशीची लढत आहे. येथे अपना दल कमरवाडीच्या पल्लवी पटेल समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. तसेच, अखिलेश यादव यांना करहल जागेवर भाजपाचे एसपी बघेल यांचे आव्हान आहे. त्याचवेळी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या फाजिलनगर जागेवरही पेच दिसत आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या जहूराबाद विधानसभेच्या जागेवर भाजपचे कालीचरण राजभर जोरदार लढत आहेत.

20 व्हीआयपी जागा1. गोरखपूर सदर- योगी आदित्यनाथ2. करहल- अखिलेश यादव3. रामपूर - आझम खान4. स्वार - अब्दुल्ला आझम5. शहाजहानपूर - सुरेश खन्ना6. बलिया - राम गोविंद चौधरी7. आझमगड - दुर्गा प्रसाद यादव8. सरधना - संगीत सोम9. मथुरा -  श्रीकांत शर्मा10. महाराजपूर - सतीश महाना11. मानकापूर - रमापती शास्त्री12. बन्सी - जय प्रताप13. मल्हानी सीट - धनंजय सिंह14. मऊ सदर - अन्सारी15. कुंडा - रघुराज प्रताप सिंह16. अमेठी - संजय सिंह17. संभल - इक्बाल महमूद18. लखनऊ कॅंट - ब्रजेश पाठक19. सिरथू - केशव प्रसाद मौर्य20. जहूराबाद - ओमप्रकाश राजभर

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२