शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

'योगी आदित्यनाथांना माझी हत्या करायची आहे', ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:14 AM

up assembly elections 2022 : योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. 

लखनऊ : सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (Suheldev Bhartiya Samaj Party) अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे, असा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. 

ओम प्रकाश राजभर म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांना माझी हत्या करायची आहे. त्यांचे गुंड बनारसला पाठवण्यात आले होते. काही काळ्या कोटचे गुंड होते तर काही बाहेरून पाठवलेले होते. डीएम आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार लोक पोहोचवण्यात आले. निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नामांकन कक्षात उमेदवार, प्रस्तावक आणि वकील असे तीनच लोक असले पाहिजे. मात्र, फक्त तीन लोक नामांकन कक्षात जाऊ शकत, असे असताना शेकडो लोक तिथे कसे पोहोचले? असा सवाल ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

सुरक्षा पुरवण्याची मागणीओम प्रकाश राजभर म्हणाले की, "निवडणूक आयोगाने मला सुरक्षा द्यावी, अन्यथा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माझी हत्या करू शकतात. पण दलित-गरीब-मागासांचा हा लढा थांबणार नाही, असा इशारा मला द्यायचा आहे. मी माझ्यासारखे हजारो ओम प्रकाश राजभर निर्माण केले आहेत. एका ओम प्रकाश राजभरला मारले तर हजार ओम प्रकाश राजभर समोर येतील."

ओम प्रकाश राजभर यांचा गंभीर आरोपदरम्यान, 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान ओम प्रकाश राजभर यांचे हे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपा आरक्षण संपवत असल्याचा आरोपही ओम प्रकाश राजभर यांनी केला. बनारसला गेल्यावर लोकांनी गोंधळ घातल्याचा आरोप ओम प्रकाश राजभर यांनी केला. ते लोक भाजपने पाठवलेले गुंड होते. ते माझी हत्या सुद्धा करू शकले असते, असे ओम प्रकाश राजभर म्हणाले. 

डीएम आणि पोलीस आयुक्तांना हटवण्याची मागणी ओम प्रकाश राजभर हे शिवपूर विधानसभा मतदारसंघातून आपला मुलगा अरविंद राजभर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता, त्यांना विरोध करण्यात आला आणि न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर ओम प्रकाश राजभर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि वाराणसीच्या डीएम आणि पोलिस आयुक्तांना हटवण्याची मागणी केली. तसेच, निवडणूक आयोगाकडे आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथ