जेव्हा भगवान श्रीकृष्णांची स्मृती आपल्या समोर येते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या एका हातात बासरी आहे, तर दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र आहे. केवळ बासरीने काम चालणार नाही. तर सुरक्षिततेसाठी सुदर्शनही आवश्यक आहे. तसेच, पाकिस्तान हा 'नासूर' आहे; तो माणुसकीचा 'कॅन्सर' आहे, त्याचा उपचार जगातील शक्तींना वेळेतच करावा लागेल, असे उत्तर प्रदेशची मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (16 सप्टेंबर) पश्चिम त्रिपुरातील बराकथल येथे सिद्धेश्वरी मंदिरच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते.
योगी म्हणाले, अयोध्या, मथुरा आणि काशी हे तीन सनातन हिंदू धर्माचे महत्वाचे स्तंभ आहेत. मानबिंदू आहेत. जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल.
उत्तर प्रदेशात डबल इंजिनचे सरकार आले, सुरक्षिततेचे वातावरण मिळाले. दंगलखोरांना बुलडोजरही दिले गेले. याच बरोबर भक्तांसाठी श्री राम मंदिराचेही काम करण्यात आले."
काँग्रेसवर निशाणा -काँग्रेस पक्षावर हल्ला चढवत योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी देशाची फाळणी मान्य केली. आरएसएसने 1925 मध्येच धोका ओळखला होता. त्यांना माहीत होते की, आपण याच पद्धतीने काँग्रेसकडून चालवल्या जात असलेल्या संधीवर चालत राहिलो, तर ते देशाचे तुकडे करतील. जो विचार त्यांनी केला होता तो खरा ठरला आणि देशाचे तुकडे झाले.
तुमच्या शक्तीचा परिचय सर्वांना असायला हवा - योगी म्हणाले, "जर आपण धर्माचे रक्षण कराल, तर धर्म आपले रक्षण करेल, पण स्वार्थासाठी त्याचा वापर कराल तर तेच हाल होतील. आम्ही सशक्त भारतासाठी काम करत आहोत. त्रिपुरा स्वतंत्र राहिला कारण येथील राजाने आपल्या सामर्थ्याचा परिचय करून दिला. जो कोणी आपली शक्ती गमावून शत्रूला समजून घेणण्याची चूक करेल, त्याचे हाल आजच्या बांगलादेश प्रमाणे होतील."