सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकीचे (UP Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, सोमवारी आपल्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये (Virtual Rally) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनचौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामांची लेखाजोखा जनतेसमोर मांडला. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला.
"आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचं राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, ज्याचं आचरणच ते दंगलीच्या मानसिकतेवाले लोक असल्याचे आहे," असं मोदी म्हणाले. जनचौपाल कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शामली, मुजफ्फरनगर, बागपत, सहारनपुर आणि गौतम बुद्ध नगर या ठिकाणच्या मतदारांना संबोधित केलं. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात नव्या शिक्षण संस्था, आयटीआय. नवी वैद्यकीय कॉलेजेस या ठिकाणी खुली झाली. इतकी विद्यापीठंही उभारली गेली, यामागे तरुणांची स्वप्न आणि आकांक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
'मध्यम वर्गीयांना नुकसान'उत्तर प्रदेशात राहणारी जनता यापूर्वीच्या सरकारला ओळखतात. त्यांनी भ्रष्टाचार आणि रियल इस्टेट माफियाची अशी युती केली एनसीआरमध्ये हजारो घर खरेदीदारांना आपल्या आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागली. याचं मोठं नुकसान आपल्या मध्यम वर्गाच्या लोकांना सोसावं लागल्याचंही ते म्हणाले.