शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

UP Election results 2022: BJP हायकमांडने सर्व नवनिर्वाचित आमदारांना लखनौला बोलावले, युतीचे नेतेही उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 1:20 PM

UP Election Results: आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. दरम्यान, भाजपने आपल्या सर्व विजयी उमेदवारांना तातडीने लखनौला येण्याचे निर्देश दिले आहेत.

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. यूपी निवडणुकीत भाजप 264 जागांवर आघाडीवर आहे, तर समाजवादी पक्ष 110, बसपा 4, काँग्रेस 4 आणि इतर तीन जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप नेतृत्वाने सर्व नवनिर्वाचित आमदारांना लखनौला बोलावल्याचे वृत्त आहे. संघटनेने भाजपचा मित्र पक्ष निषाद पक्ष आणि अपना दल (एस) च्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना लखनौमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

योगी आदित्यनाथ आघाडीवरताज्या ट्रेंडनुसार, यूपीचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगी आदित्यनाथ हे समाजवादी पार्टी (SP) आघाडीच्या उमेदवार सुभावती शुक्ला यांच्यावर आघाडीवर आहेत. योगी आदित्यनाथ 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. ट्रेंडमध्ये काँग्रेसच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेस बसपापेक्षा एका जागेने पुढे आहे. पण ट्रेंडची खास गोष्ट म्हणजे यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू तमकुहिराज जागेवर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

काँग्रेसच्या आणखी जागा जाण्याची शक्यतानिवडणुकीच्या निकालांवर झालेल्या चर्चेदरम्यान तज्ज्ञांनी सांगितले की, ट्रेंडवरून काँग्रेसची स्थिती काय आहे हे समजू शकते. असेही होऊ शकते की, अंतिम निकाल येईपर्यंत काँग्रेसच्या जागांमध्ये आणखी घट होऊ शकते. ट्रेंडवर भाजप नेते समीर सिंह म्हणतात की, हा पीएम मोदी आणि सीएम योगींच्या धोरणांचा विजय आहे. जनतेचा भाजपच्या धोरणांवर वारंवार विश्वास बसत असून, जे भाजपला विनाकारण घेरण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा जनतेने पर्दाफाश केला आहे, असेही ते म्हणाले.

अखिलेश आघाडीवरदरम्यान, जौनपूरच्या मल्हनी मतदारसंघातून JD(U) उमेदवार धनंजय सिंह मागे आहेत, तर अब्बास अन्सारी मऊ शहर मतदारसंघातून मागे आहेत. जसवत नगर मतदारसंघातून शिवपाल यादव आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेच्या करहल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मजबूत आघाडी कायम ठेवली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात अखिलेश त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे एसपी सिंह बघेल यांच्यावर 12000 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. अखिलेश पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी