शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

UP assembly election 2022:  विजयाचा दावा करणाऱ्या ८० टक्के नेत्यांचं डिपॉझिट होतं जप्त, जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 9:49 AM

UP assembly election 2022:  दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्येक पक्ष आणि नेता स्वत:च्या विजयाचा दावा करत असतो.

UP assembly election 2022:  दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्येक पक्ष आणि नेता स्वत:च्या विजयाचा दावा करत असतो. पण ज्यावेळी निकाल जाहीर होतात त्यावेळी वेगळच चित्र पाहायला मिळतं. १९८९ पासून ते अगदी २०१७ पर्यंत उत्तर प्रदेशात ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. त्याची आकडेवारी एकदा पाहिली असता यातील जवळपास ८० टक्के उमेदवारांवर थेट डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आल्याचं दिसून येतं. म्हणजेच फक्त २० टक्के उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचविण्यात यश मिळतं. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार उत्तर प्रदेशात मुख्यत्वे बहुतांश जागांवर केवळ दोन पक्षांमध्ये लढत पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचा आकडा यावेळी वाढू शकतो. 

यूपीत किती जण आजमावताहेत नशीबविधानसभा निवडणूक २०२२ मध्ये एकूण ४४४१ उमेदवारांचं नशीब पणाला लागलं आहे. विशेष म्हणजे २०१७ साली यूपी निवडणुकीत ४८५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी फक्त चार मतदार संघ असे आहेत की जिथं एका मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी उमेदवारांचा आकडा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी आहे. 

डिपॉझिट नेमकं किती?विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना ५ हजार रुपये डिपॉझिट भरावं लागतं. निवडणूक निकालात उमेदवाराच्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी एक षष्ठांश मतं मिळाली तरच उमेदवाराला डिपॉझिट परत दिलं जातं. तसं न झाल्यास उमेदवाराला डिपॉझिट परत दिलं जात नाही. 

१९९३ मध्ये सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त१९८९ पासून उत्तर प्रदेशात जितक्या विधानसभा निवडणूक झाल्या आहेत. त्यात १९९३ साली सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. १९९३ मध्ये तब्बल ८८.९५ टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यावेळी एकूण ९७२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातून ८६५२ जणांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. १९९६ साली ४४२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील ३२४४ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 

२००२ मध्ये एकूण ५५३३ उमेदवार होते, त्यापैकी ४४२२ उमेदवार त्यांचं डिपॉझिट वाचविण्यात यशस्वी झाले. तसेच २००७ मध्ये ६०८६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ५०३४ उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आलं नाही. २०१२ मध्ये एकूण ६८३९ उमेदवारांपैकी ५७६० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१७ मध्येही असंच काहीसं घडलं होतं. त्यानंतर ४८५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३७३६ उमेदवारांना डिपॉझिट परत मिळवता आलं नव्हतं. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Electionनिवडणूक