शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा दणदणीत विजय, दीड लाखांच्या फरकाने भाजप-सपाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 6:41 PM

चंद्रशेखर आझाद यांनी नगीना मतदारसंघात 512552 मते मिळवली.

UP Lok Sabha Election Results 2024: उत्तर प्रदेशच्या नगीना लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. येथे भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) उमेदवार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे ओम कुमार, सपाचे मनोज कुमार आणि बसपचे सुरेंद्र पाल सिंह होते. सपा, बसपा आणि भाजप उमेदवाराचा पराभव करुन चंद्रशेखर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 

चंद्रशेखर आझाद यांना नगीना मतदारसंघात एकूण 512552 मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ओम कुमार यांना 361079, समाजवादी पक्षाचे उमेदवार मनोज कुमार यांना 102374 आणि बसपाचे सुरेंद्र पाल सिंह यांना 13272 मते मिळाली. म्हणजेच, चंद्रशेखर यांनी ही जागा 151473 मतांनी जिंकली आहे. 

विजयानंतर काय म्हणाले चंद्रशेखर ?चंद्रशेखर आझाद यांनी नगीना मतदारसंघातून दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ज्यांनी मला आशीर्वाद दिला त्या नगिनाच्या लोकांचे मी आभार मानतो. माझ्या विरोधात अपप्रचार करणाऱ्यांचेही मला आभार मानायचे आहेत. 

दरम्यान, 2014 मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती तर 2019 मध्ये सपा-बसपा युतीचे उमेदवार गिरीश चंद्र यांनी हा मतदारसंघ काबीज केला होता. चंद्रशेखर आझाद इंडिया आघाडीत सामील होतील, अशी अटकळ यापूर्वी वर्तवली जात होती. मात्र त्यांनी एकट्याने निवडणूक लढवून सर्व मोठ्या पक्षांना मोठा धक्का दिला.

 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा