UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:41 PM2022-01-19T21:41:28+5:302022-01-19T21:48:00+5:30

या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले.

UP opinion poll 2022 who among the win BJP SP congress and BSP in Uttar Pradesh election | UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

Next

देशातील पाच राज्यांत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. सर्वच जण वेगवेगळे कयास लावत आहेत. या पाचही राज्यांपैकी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे देशातील जनतेचे सर्वाधिक लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी मीडिया आणि डिझाइन बॉक्स्डने देशातील सर्वात मोठा सर्व्हे (Opinion Poll) केला आहे. (Uttar Pradesh Opinion Poll 2022)

10 लाखांहून अधिक लोकांचा समावेश -
या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन प्लस-मायनस 4 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे, हा केवळ एक ओपिनियन पोल आहे. यात लोकांच्या मतांचा समावेश आहे. निवडणुकीत जनमत हे सर्वोपरी असते.

ओपिनिय पोलमध्ये  मध्य उत्तर प्रदेशात कुठल्या पक्षाला किती जाका -
- भाजप+ ला 47-49 जागा मिळू शकतात.
- समाजवादी पार्टीच्या आघाडीला 16-20 जागा मिळू शकतात.

2017मध्ये मध्य यूपीमध्ये कोणत्या पक्षाला किती मते मिळाली होती -
- भाजपला एकूण 44 टक्के मते मिळाली होती.
- समाजवादी पार्टीला 23 टक्के मते मिळाली होती.
- काँग्रेस पक्षाला 4 टक्के मते मिळाली होती.
- बीएसपीला 21 टक्के मते मिळाली होती.
- तर इतरांना 7 टक्के मते मिळाली होती.

2022च्या ओपिनियन पोलमध्ये मध्य यूपीत कुठल्या पक्षाला किती मते -
- भाजप+ ला 45 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- समाजवादी पार्टीच्या आघाडीला 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- बीएसपीला 08 टक्के टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- काँग्रेसला 6 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- तर इतरांच्या वाट्याला 9 टक्के मते जाण्याचा अंदाज आहे.

मध्य उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी कुणाला किती पसंती - 
- सीएम योगी आदित्यनाथ यांना 47 टक्के लोकांची पसंती.
- अखिलेश यादव यांना 35 टक्के लोकांची पसंती.
- मायावतींना 9 टक्के लोकांची पसंती.
- प्रियांका गांधी वाड्रा यांना 4 टक्के लोकांची पसंती.
- तर 5 टक्के लोकांना मुख्यमंत्री पदासाठी दुसरा चेहरा पसंत आहे.

2022 ओपिनियन पोलमध्ये अवधमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात -
- भाजप+ ला 76-82 जागा मिळू शकतात.
- समाजवादी पार्टी आघाडीला 34-38 जागा मिळू शकतात.
- बीएसपीला 0 जागा मिळू शकतात.
- काँग्रेसला 1-3 जागा मिळू शकतात.
- तर इतरांना 1-3 जागा मिळू शकतात.

अवधमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुणाला किती पसंती - 
- सीएम योगी आदित्यनाथांना 47 टक्के लोकांची पसंती.
- अखिलेश यादव यांना 34 टक्के लोकांची पसंती.
- मायावतींना 10 टक्के लोकांची पसंती.
- प्रियांका गांधी वाड्रांना 5 टक्के लोकांची पसंती.
- तर 4 टक्के लोकांची इकर चेहऱ्यांना पसंती.

2022च्या ओपिनियन पोलमध्ये अवधमध्ये कुठल्या पक्षाला किती मते -
- भाजप+ ला 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला फायदा होत आहे.
- समाजवादी पार्टी आघाडीला 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- बीएसपीला 8 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- काँग्रेसला 8 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- तर इतरांच्या पारड्यात 9 टक्के मते जाण्याचा अंदाज आहे.

2022 मध्ये रोहेलखंडमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता -
- भाजप+ ला 19-21 जागा मिळू शकतात.
- समाजवादी पार्टी आघाडीला 3-7 जागा मिळू शकतात.
- बीएसपीला 0 जागा मिळू शकतात.
- काँग्रेसला 0 जागा मिळू शकतात.
- तर इतरांच्या पारड्यात 0 जागा जाऊ शकतात.

रोहेलखंडात सीएम पदासाठी कुणाला किती पसंती - 
- सीएम योगी आदित्यनाथ यांना 47 टक्के लोकांची पसंती.
- अखिलेश यादव यांना 37 टक्के लोकांची पसंती.
- मायावतींना 9 टक्के लोकांची पसंती.
- प्रियांका गांधी वाड्रांना 3 टक्के लोकांची पसंती.
- 4 टक्के लोकांची इतरांना पसंती.

2022 मध्ये रोहेलखंडात कुठल्या पक्षाला किती मते - 
- भाजप+ ला 51 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- समाजवादी पार्टी आघाडीला 36 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- बीएसपीला 07 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- काँग्रेसला 4 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- तर इतरांना 2 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

बुंदेलखंडात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात - 
- भाजप+ - 17-19 जागा मिळू शकतात.
- समाजवादी पार्टी आघाडी - 0-1 जागा मिळू शकतात.
- बीएसपी - 0 जागा मिळू शकतात.
- काँग्रेस - 0 जागा मिळू शकतात.
- तर इतरांना - 0 जागा मिळू शकतात.

बुंदेलखंडमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती - 
- सीएम योगी आदित्यनाथ - 50 टक्के लोकांची पसंती.
- अखिलेश यादव - 31 टक्के लोकांची पसंती.
- मायावती - 11 टक्के लोकांची पसंती.
- प्रियांका गांधी वाड्रा - 5 टक्के लोकांची पसंती.
- इतर - 3 टक्के लोकांची पसंती.

बुंदेलखंडमध्ये कुठल्या पक्षाला किती मते -
- भाजप+ ला 59 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- समाजवादी पार्टी आघाडीला 21 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- बीएसपीला 10 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- काँग्रेसला 5 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
- तर इतरांना 5 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

पूर्वांचलमध्ये कुणाला मिळू शकतात किती जागा - 
- BJP+ - 53 ते 59
- SP+ - 39 ते 45
- BSP - 2 ते 5
- CONG - 1 ते 2
- OTH - 1 ते 3

पूर्वांचलमध्ये  कुणाला किती मते -
- भाजप+ - 39 टक्के मते मिळण्याचा अंदाज.
- समाजवादी पार्टी आघाडी - 36 टक्के मते मिळण्याचा अंदाज.
- बीएसपी - 11 टक्के मते मिळण्याचा अंदाज.
- काँग्रेस - 8 टक्के मते मिळण्याचा अंदाज.
- इतर - 6 टक्के मते मिळण्याचा अंदाज.

पूर्वांचलमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला किती पसंती - 
- योगी आदित्यनाथ (BJP) - 48%
- अखिलेश यादव (SP) - 35%
- मायावती (BSP) - 9%
- प्रियांका गांधी वाड्रा (CONG) - 4%
- इतर - 4% 

Web Title: UP opinion poll 2022 who among the win BJP SP congress and BSP in Uttar Pradesh election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.