अखिलेश-मायावती यांनी प्रियांकांचं म्हणणं ऐकलं, तर 2024 च्या निवडणुकीत भाजपची अडचण वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:40 PM2023-02-27T13:40:25+5:302023-02-27T13:41:39+5:30
प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र यायला हवे. निवडणुकीसाठी आता 1 वर्ष बाकी आहे, असे म्हटले आहे.
देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 2024 निवडणुकीसाठीच्या आपल्या प्लॅनचाही खुलासा केला. यावेळी त्यांनी आपल्याला कुठल्याही स्थितीत भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि मायावती (Mayawati) यांच्या शिवाय इतर विरोधी पक्षांनाही संदेश दिला आहे.
प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनात सर्वच विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र यायला हवे. निवडणुकीसाठी आता 1 वर्ष बाकी आहे, असे म्हटले आहे.
अखिलेश यादव आणि मायावतींना मेसेज! -
खरे तर प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणात कुठल्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. मात्र त्यांचे भाषण उत्तर प्रदेशातील मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीसाठी मोठा संदेश मानला जात आहे. यामुळे आता अखिलेश यादव आणि मायावती त्यांच्या आवाहनाचा स्वीकार करणार का? असा प्रश्न सर्वांसमोर आहे. कारण या दोन्ही पक्षांनी आघाडी करण्यास नकार दिला आहे.
सपा-बसपा काँग्रेससोबत आल्यास भाजपची अडचण वाढणार!
सर्वच विरोधी पक्ष एकत्रीत येऊन भाजपचा सामना करतील अशी आशा आहे. तसेच काँग्रेसकडून सर्वाधिक आशा असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे. जर प्रियांकांना साद देत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी (BSP) काँग्रेससोबत गेले तर 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अडचण निर्माण होऊ शकते.