शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

Rampur By Election Live: आझम खानच्या रामपूरमध्ये गेम पालटला, भाजप उमेदवाराने घेतली 12 हजार मतांची आघाडी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 3:12 PM

Rampur By Election Live: उत्तर प्रदेशातील रामपूर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत राजकीय चित्र बदलताना दिसत आहे.

Rampur By Election Result :उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध रामपूर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत अचानक राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. मतमोजणीच्या 26व्या फेरीनंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आकाश सक्सेना यांनी सपा उमेदवार असीम राजा यांच्यावर सुमारे 12 हजार मतांची आघाडी घेतली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आकाश सक्सेना यांना 50,435 आणि असीम राजा यांना 38,632 मते मिळाली आहेत. 

सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर असीम रझाने शानदार पुनरागमन केले होते. मात्र, आता भाजपच्या उमेदवाराने पुनरागमन केले असून विजयाकडे वाटचाल करत आहे. रामपूर बाहुबली नेता आझम खान याची पारंपारिक सीट आहे, त्यामुळेच राज्यातील प्रत्येकाची नजर या पोटनिवडणुकीवर आहे. आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर येथे पोटनिवडणूक लागली होती. 

आझम खानसाठी प्रतिष्ठेची लढाई5 डिसेंबर रोजी झालेल्या रामपूर विधानसभा मतदारसंघात 33 टक्के मतदान झाले होते. आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. आझम खान यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. अशा स्थितीत या जागेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला होता. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून रामपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.

रामपूर कोण जिंकणार?रामपूरमध्ये यावेळी अत्यल्प मतदान झाल्यामुळे भाजप आशावादी आहे, तर समाजवादी पक्षाच्या छावणीत प्रचंड निराशा आणि अस्वस्थता आहे. रामपूर अशी जागा आहे जिथे 55 ते 60 टक्के मुस्लिम मतदार आहेत आणि यावेळी मतांची टक्केवारी सर्वात कमी नोंदवली गेली आहे. रामपूर जागेवर केवळ 33-34 टक्के मतदान झाले, त्यामुळे आझम खान यांच्याविरोधात मुस्लिमांची नाराजी उघड झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी