शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुलांनी मालमत्ता नावावर करण्याचा व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना संपवले; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:32 IST

उत्तर प्रदेशात मुलांनीच वडिलांची हत्या करुन बनाव रचल्याचे समोर आले आहे.

UP Crime:उत्तर प्रदेशात संपत्तीसाठी मुलांनीच वडिलांची कट रचून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बुलंदशहरमध्ये दोन भावांनी  गळा दाबून वडिलांची हत्या केली. दहा दिवसांनी या हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. युट्यूबवर व्हिडीओ पाहून मुलांनी वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. वडील जमीन विकून टाकतील या भीतीने मुलांनी टोकाचे पाऊल उचलले.

बुलंदशहरातील धनौरा गावात एका रिकाम्या जागेत एक मृतदेह सापडला होता. पोलिसांच्या तपासात मुलांनीच वडिलांचा खून केल्याचे समोर आलं आहे. पोलिस पथकाने वडिलांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन मुलांना अटक केली आहे. आरोपी मुलांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी हत्येत वापरलेला स्कार्फ, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. २ एप्रिल रोजी सत्यवीर याचा मृतदेह गावातील मंदिराजवळील कालव्याच्या काठावर एका रिकाम्या जागेत सापडला होता.

सत्यवीर यांचा मुलगा इंद्रजित याने काकोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना धक्का बसला. सत्यवीर याच्या नावावर ३८ बिघा जमीन होती. त्याला दारू पिण्याचे, जुगार खेळण्याचे व्यसन होते. त्याची दोन्ही मुलं इंद्रजित उर्फ ​​बिट्टू आणि जॅकी यांना भीती होती की वडील जमीन विकतील. याच कारणामुळे दोघांनीही त्यांच्या वडिलांचा खून करण्याचा कट रचला.

दोन्ही मुलांनी ठरल्याप्रमाणे वडिलांचा काटा काढला. १ एप्रिल रोजी सत्यवीर दारू पिऊन घरी पोहोचला तेव्हा त्याचा मोठा मुलगा इंद्रजितने त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. जेवणानंतर सत्यवीर झोपी गेला तेव्हा त्याच्या दोन्ही मुलांना स्कार्फने गळा दाबून त्याला ठार मारले. हत्येनंतर दोन्ही भाऊ मृतदेह मोटारसायकलवरून घेऊन गेले. गावातील मंदिराजवळील नदीकाठी असलेल्या एका रिकाम्या जागेत मृतदेह फेकून दिला. त्यांना हा अपघात असल्याचे भासवायचे होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.

पोलिसांना मुलांनी १ एप्रिलच्या रात्री वडील सत्यवीर शेतावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्याचे सांगितले. मात्र ते रात्री उशिरापर्यंत परतले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना वडिलांचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा इंद्रजित आणि जॅकीचे म्हणणे वेगळे होते. पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली तेव्हा प्रकरण उघडकीस आले. खून करण्यापूर्वी, दोन्ही भावांनी यूट्यूबवर 'वडिलांच्या हत्येनंतर मालमत्ता मुलांच्या नावावर कशी हस्तांतरित होते' हा व्हिडिओ सात वेळा पाहिला असल्याचे तपासात समोर आले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस